varanasis international cricket stadium pm modi kashi visit
वाराणसी क्रिकेट स्टेडियममध्ये महादेवाची झलक, डमरू-त्रिशूल आणि बेलपत्राची डिझाईन! By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 1:33 PM1 / 8भगवान शिवाची नगरी काशी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्टेडियमची पायाभरणी करण्यासाठी वाराणसीला जाणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे काही संगणकीकृत फोटो नरेंद्र मोदींनी फेसबुकवर शेअर केले आहेत.2 / 8फेसबुकवर फोटो शेअर करताना नरेंद्र मोदींनी लिहिले की, 'आज मी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहे. पूर्ण झाल्यावर ते असे दिसेल.' हे स्टेडियम मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमधील राजतलाबच्या गंजारीमध्ये ३० एकरांपेक्षा जास्त जागेत विकसित केले जाणार आहे.3 / 8जवळपास ४५० कोटी रुपये खर्च करून स्टेडियम विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश सरकारने वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामासाठी भूसंपादनासाठी १२१ कोटी रुपये खर्च केले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) स्टेडियमच्या बांधकामासाठी अंदाजे ३३० कोटी रुपये खर्च करणार आहे.4 / 8वाराणसीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची क्षमता ३०,००० प्रेक्षकांची असणार आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था वाराणसीच्या घाटातील पायऱ्यांसारखी असेल. तीन वर्षांत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्टेडियमच्या मुख्य इमारतीची रचना भगवान शिवाच्या डमरूप्रमाणे करण्यात येणार आहे.5 / 8स्टेडियम अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल, ज्यामध्ये फ्लडलाइट्स, अत्याधुनिक ड्रेनेज सिस्टम आणि सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त क्लब हाऊस यांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंसाठी स्वतंत्र सराव मैदानही असणार आहे.6 / 8गंजारीमध्ये उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्टेडियमची थीम धार्मिक असणार आहे. हे देशातील पहिले स्टेडियम असेल ज्याच्या डिझाइनमध्ये भगवान शिव आणि त्यांच्या शहर काशीची झलक दिसणार आहे.7 / 8यामध्ये चंद्रकोरीच्या आकाराचे छताचे आवरण, त्रिशूळ आकाराचे फ्लडलाइट्स, घाटाच्या पायऱ्यांवर आधारित आसनव्यवस्था आणि पुढील भागावर बेलपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे आदी डिझाइन्स विकसित करण्यात येणार आहेत.8 / 8याशिवाय, स्टेडियमचे प्रवेशद्वार भगवान शिवाच्या आवडत्या बेलपत्राप्रमाणे डिझाइन केलेले असणार आहे. स्टेडियमचा बाहेरचा भाग गंगा घाटाच्या पायऱ्यांसारखा असणार आहे. हे स्टेडियम डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. कानपूर आणि लखनौनंतर उत्तर प्रदेशातील तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications