ऑनलाइन लोकमत भोपाळ, दि. ३१ - सुरक्षा रक्षकाची हत्या करुन भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी मध्यप्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. भोपाळ कारागृहापासून १० किमी अंतरावर अचारपुरा गावाजवळ ही चकमक झाली.रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकाची हत्या करुन हे दहशतवादी तुरुंगातून फरार झाले होते. मध्यवर्ती कारागृहाच्या बी ब्लॉकमध्ये या आठही दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. या प्रकरणी तुरुंग अधीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पलायनासंबंधी मध्यप्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे.त्यांनी स्टीलच्या प्लेटने सुरक्षा रक्षकाची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चादरींच्या सहाय्याने भिंत चढून त्यांनी पलायन केले. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती भोपाळचे डीआयजी रमन सिंह यांनी दिली. पळालेल्या आठ दहशतवाद्यांमध्ये जाकीर मेहबूब शेख आणि अमजद यांचा समावेश असून, ते २०१३ मध्येही कारागृहातून पळाले होते.सिमीचे दहशतवादी मध्यप्रदेशातील कारागृहातून पळून जाण्याची ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये सिमीचे सात दहशतवादी खांडवा तुरुंगातून पळाले होते. स्नानगृहाच्या खिडकीला असलेल्या सळया तोडून या दहशतवाद्यांनी पलायन केले होते. मोठा सुरक्षा बंदोबस्त असलेल्या मध्यवर्ती कारागृहातून या दहशतवाद्यांनी अशा प्रकारे पलायन केल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.खांडवा तुरुंगातून २०१३ मध्ये पळालेल्या सात दहशतवाद्यांना तीन वर्षांनी अटक करण्यात आली होती. हे दहशतवादी फरार असताना मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. ठार झालेल्या अतिरेक्यांची नावेशेख मुजीब, खालिद अहमद, अकील, अब्दुल माजिद, मोहम्मद सलीक, जाकिर हुसैन, शेख महबूब, अमजद उर्फ पप्पू शेख #WATCH Bhopal SP Arvind Saxena speaks on the 8 SIMI terrorists who fled from Bhopal central jail pic.twitter.com/q9uCOSF9fh— ANI (@ANI_news) October 31, 20168 SIMI terrorists who fled from Bhopal Central Jail killed in an encounter in Eintkhedi village on Bhopal outskirts (ANI Exclusive pics) pic.twitter.com/FdWyV8NLfw— ANI (@ANI_news) October 31, 2016