Vijayaraje to Jyotiraditya is the political journey of the scindia family BKP
विजयाराजे ते ज्योतिरादित्य, अशी आहे शिंदे कुटुंबीयांची राजकीय कारकीर्द By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:25 PM1 / 10काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील मातब्बर नेते असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशच्या आणि देशाच्या राजकारणातील एक अग्रगण्य घराणे असलेले शिंदे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यानिमित्त आज जाणून घेऊया शिंदे कुटुंबीयांंच्या राजकीय प्रवासाविषयी. 2 / 10ग्वाल्हेर संस्थानच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. १९५७ मध्ये त्या गुणा मतदारसंघातून निवडून आल्या. मात्र १० वर्षांतच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. 3 / 10दरम्यान, १९६७ मध्ये विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी केलेल्या बंडामुळे काँग्रेसचे तत्कालीन सरकार कोसळले होते. 4 / 10विजयाराजेंच्या काळात ग्वाल्हेर आणि आसपासच्या परिसरात भारतीय जनसंघाची पाळेमुळे रुजली. त्यामुळे १९७१ च्या इंदिरा लाटेतही गुणा, ग्वाल्हेर आणि भिंड मतदारसंघातल जनसंघाचे उमेदवार विजयी झाले. 5 / 10विजयाराजे शिंदेंचे पुत्र माधवराव शिंदे यांनी जनसंघामधूनच राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. मात्र ते जनसंघामध्ये फार काळ थांबले नाही. दरम्यान, १९८४ मध्ये त्यांनी ग्वाल्हेर मतदारसंघातून अटल बिहारी वाजपेयी यांना पराभवाचा धक्का दिला होता. २००१ मध्ये विमान अपघातात त्यांचे निधन झाले. 6 / 10विजयाराजे शिंदेंच्या कन्या वसुंधरा राजे यांनी भाजपामधूनच आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी केंद्रीय मंत्रिपद तसेच राजस्थानचे मुख्यमंत्रिपदही भूषवलेय. 7 / 10विजयाराजे शिंदेंच्या कन्या यशोधराराजे शिंदे यांनी अमेरिकेतून भारतात परतल्यावर भाजपात प्रवेश केला. त्यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपद सांभाळले आहे. 8 / 10माधवराव शिंदेंचे पुत्र असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा यशस्वीपणे चालवला. ते गुणा मतदारसंघातून सातत्याने निवडून आले. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 9 / 10वसुंधरा राजेंचे पुत्र दुष्यंत सिंह हे सुद्धा राजकारणात सक्रीय आहेत. सध्या ते राजस्थानमधून लोकसभेवर निवडून आले आहेत. 10 / 10विजयाराजे शिंदेंची अन्य एक कन्या उषाराजे शिंदे या मात्र राजकारणापासून दूर राहिल्या. त्यांनी नेपाळमधील समशेरजंग बहादूर राणा यांच्यासोबत विवाह केला होता. तसेच विजयाराजेंच्या अन्य एक कन्या पद्माराजे शिंदे यांचे तरुण वयातच अकाली निधन झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications