या गावात प्रचारासाठी नेत्यांना प्रवेशबंदी, मात्र होते 95 टक्क्यांहून अधिक मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 14:08 IST
1 / 7लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे. गुजरातमधील 26 लोकसभा मतदानसंघांमध्येही आज मतदान होत असून, गुजरातमध्ये असाही एक गाव आहे जिथे नेत्यांना प्रचारासाठी प्रवेशबंदी असते. मात्र या गावात नेहमी 95 टक्क्यांहून अधिक मतदानही होते. 2 / 7राजसमढियाल असे या गावाचे नाव आहे. गुजरातमधील या गावात प्रचारासाठी नेत्यांना येऊ दिले जात नाही. मात्र या गावातील मतदार मतदानाच्या हक्काबाबत खूप जागरूक आहेत. त्यामुळे या गावात नेहमी 95 टक्क्यांहून अधिक मतदान होते. 3 / 7राजसमढियाल हे गाव गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात वसलेले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कुठल्याही पक्षाच्या नेत्याने गावात येऊ नये, असा नियम या गावाने बनवलेला आहे. 4 / 7विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या प्रचारामुळे गावातील वातावरण खराब होते, असे येथील ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे जेव्हा इतर ठिकाणी जेव्हा प्रचारभा जोरात सुरू असतात तेव्हा या गावात मात्र शांतता असते. 5 / 7विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या प्रचारामुळे गावातील वातावरण खराब होते, असे येथील ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे जेव्हा इतर ठिकाणी जेव्हा प्रचारभा जोरात सुरू असतात तेव्हा या गावात मात्र शांतता असते. 6 / 7विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या प्रचारामुळे गावातील वातावरण खराब होते, असे येथील ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे जेव्हा इतर ठिकाणी जेव्हा प्रचारभा जोरात सुरू असतात तेव्हा या गावात मात्र शांतता असते. 7 / 7केवळ जास्त मतदान होणारे गाव अशीच राजसमढियाल या गावाची ओळख नाही तर या गावाकडे गुजरातमधील आदर्श गाव म्हणून पाहिले जाते. या गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील घर आणि दुकानांना कुलूप लावले जात नाही.