Violation of the country's power, the Minister of Defense rajnath singh worshiped arms
जवानांच्या शौर्याचं कौतुक, संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा By महेश गलांडे | Published: October 25, 2020 12:01 PM1 / 10विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली. 2 / 10भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केलं, लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथसिंह यांनी व्यक्त केली. 3 / 10भारत देशाचं सैन्य आपल्या जमिनीच्या एक इंचही भूभागावर कोणाला कब्जा करु देणार नाही, याची खात्रीही त्यांनी देशवासीयांना दिली. 4 / 10राजनाथसिंह हे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून तेथील युद्ध स्मारक व सैन्य दलाच्या भेटी घेत आहेत. 5 / 10सुकना युद्ध स्मारक येथे जाऊन राजनाथसिंह यांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली, तसेच सैनिकांचे बलिदान कधीही विसरता येणार नसल्याचे म्हटले. 6 / 10विजयादशमीच्या मुहूर्तावर तेथील शस्त्रांचं पूजन करुन भारतीय सैन्याला प्रोत्साहन देण्याचं कामही सिंह यांनी केलंय. भारत-चीन सीमारेषेवरील तणाव संपुष्टात येण्याची इच्छा सिंह यांनी बोलून दाखवली. 7 / 10दार्जिलिंग दौऱ्यात सिंह यांनी सीमा कडक संघटना (बीआरओ) द्वारे उभारण्यात आलेल्या गंगटोक-नाथुला रोडचे उद्घाटन केले, सिक्कीममध्ये 65 किमीच्या रस्ते निर्मित्तीचं काम प्रगतीपथावर असल्याचंही सिंह यांनी म्हटलं.8 / 10सिंह यांनी शस्त्रपूजा केलेल्या स्थानावरुन नियंत्रण रेषा केवळ 2 किमी अंतरावर आहे, यावेळी लष्करप्रमुख जनरल मुकूंद नरवणे हेही उपस्थित होते9 / 10संरक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. 10 / 10देशाच्या जवानांनी सातत्याने देशाची सीमा, अखंडता आणि सार्वभौमिकतेसाठी आपलं बलिदान दिलंय, असे म्हणत शहीदांना आदरांजली वाहत सॅल्यूट केला. आणखी वाचा Subscribe to Notifications