शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्लीच्या जवळपास असलेल्या या पाच पर्यटनस्थळांना आवर्जून भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 4:39 PM

1 / 5
कामाच्या धकाधकीतून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी पिकनिकचे बेत आखले जातात. पर्यटनस्थळं लांब अंतरावर असल्यानं ब-याचदा अडचणीही येतात. परंतु दिल्लीकरांना आम्ही जवळच्याच पर्यटनस्थळांची माहिती देणार आहोत. जैसलमेर म्हणजे गोल्डन सिटी दिल्लीपासून 480 किलोमीटर अंतरावर आहे. थार वाळवंटात असलेल्या जैसलमेरमध्ये तुम्ही वाळूवर टॅक्टर आणि बाइक चालवण्याचा आनंद लुटू शकता.
2 / 5
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाही खूप सुंदर आहे. दिल्लीपासून फक्त 360 किलोमीटर अंतरावर शिमला वसलेलं आहे. इथे गेल्यावर तुम्ही टॉय ट्रेन, ट्रॅकिंग, रॉक क्लायंबिंगची मजाही लुटू शकता.
3 / 5
पॅराग्लायडर्ससाठी नौकुचियाताल ही सर्वात सुंदर जागा आहे. याला पॅराग्लायडर्सचं स्वर्ग असंही संबोधलं जातं. उत्तराखंडमधलं हे सुंदर ठिकाण दिल्लीपासून 300 किलोमीटर दूर आहे. मार्च ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत इथे जाण्यास चांगला माहोल असतो.
4 / 5
हरियाणातलं सोहनाही पर्यटकांसाठी एकदम बेस्ट पर्यटनस्थळ आहे. इथे फुग्यात बसून आकाशातून चारही दिशांचं नयनरम्य दृश्य पाहता येणार आहे.
5 / 5
नैनितालमधलं जिम कॉर्बेटही नॅशनल पार्क जंगली जनावरांसाठी प्रसिद्ध आहेत. याच्या जवळपास एडव्हेंचर स्पोर्ट्सचीही मजा लुटता येऊ शकते. दिल्लीपासून 226 किमी दूर असलेल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये तुम्ही रॉक क्लायंबिंग, माऊंटेन बायकिंग, ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंगसारख्या खेळांचा मनमुराद आनंद लुटू शकता.
टॅग्स :Travelप्रवास