Vizag Gas Leak: विशाखापट्टणममध्ये गॅसगळतीमुळे हाहाकार, पाहा अंगावर शहारे आणणारी छायाचित्रे By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 2:09 PM
1 / 10 आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे. 2 / 10 विशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून स्टीरीन नावाचा विषारी वायू लिक झाला. या विषारी वायूच्या गळतीमुळे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टम शहरात हाहाकार माजला आहे. 3 / 10 विषारी वायूच्या प्रभावामुळे कंपनीच्या आसपासच्या परिसरातील लोक श्वास कोंडून जागोजागी बेशुद्ध होऊन पडू लागले. 4 / 10 या गॅसगळतीमुळे मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास झाला. जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करून त्यांना सुरक्षित ठिकाणी तसेच रुग्णालयात हलवण्यात येत होते. 5 / 10 स्थानिक प्रशासन आणि नौदलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू करून स्थानिकांना प्रभावित भागातून बाहेर काढले. 6 / 10 गॅस लीक झाल्यानंतर कंपनीच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रशासनाकडून स्वच्छतेचे आपातकालीन काम सुरू केले. 7 / 10 सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या वायू गळतीचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, बेशुद्ध पडलेल्या लोकांना जवान असे उचलून सुरक्षित ठिकाणी नेत होते. 8 / 10 सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या वायू गळतीचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, बेशुद्ध पडलेल्या लोकांना जवान असे उचलून सुरक्षित ठिकाणी नेत होते. 9 / 10 सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या वायू गळतीचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, बेशुद्ध पडलेल्या लोकांना जवान असे उचलून सुरक्षित ठिकाणी नेत होते. 10 / 10 विशाखापट्टणममधील याच विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी गॅस लीक झाला आणखी वाचा