शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्या वाहनावरील दंड माफ करायचाय? मग नॅशनल लोक अदालतीला भेट द्या; प्रक्रिया समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 2:13 PM

1 / 10
या आधी ट्राफिक पोलिसांकडे पावतीचे पुस्तक असायचे, पोलिस वाहनधारकांच्या समोरच दंड आकारत होते. यावेळी अनेकजण पोलिसांना काहीही कारणे सांगून दंड माफ करुन घेत होते, पण आता ट्राफिक पोलिसांनी चालान ऑनलाईन केल्यामुळे काहीच करता येत नाही. दंडाची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत.
2 / 10
आपण एखादा नियम मोडला, तर काही तासातच आपल्याला दंड झाल्याचा मेसेज आपल्यावर आलेलो असतो. या मेसेजमध्ये आपल्याला किती रुपयांचा दंड आकारला आहे याची रक्कमही दिलेली असते. ही रक्कम आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेही भरता येते. पण, आपण कोणतेही नियम न मोडता जर दंड आकारला असेल किंवा दंडाची रक्कम जास्त प्रमाणात आहे म्हणून आपण कधी कधी हा दंड भरत नाही. पण ही दंडाची रक्कम भरणे गरजेचे असते.
3 / 10
लोकअदालत हे एक विशेष न्यायालय आहे, हे न्यायालय छोट्या-छोट्या बाबी आणि वाद सोडवण्यासाठी स्थापन केले, यामध्ये वाहतूक चलनाच्या प्रकरणाचाही समावेश असतो. वाहतुकीच्या किरकोळ उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये सामान्यत: लोकअदालतीमध्ये वाहतूक चलनाची प्रकरणी आपण मिटवू शकतो.यात दंड माफ होत नाही, पण दंड कमी केला जातो किंवा न्यायालयात कराराच्या आधारावर केस बंद केली जाते. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी नॅशनल लोकअदालतचे आयोजन केले जाते. तुम्हाला लोकअदालतीची तारीख तुमच्या मोबाईलवर येते, या दिवशी तुमचा दंड कमी केला जाऊ शकतो.
4 / 10
जर एखाद्या व्यक्तीने वाहतूक नियमांचे किरकोळ उल्लंघन केले असेल, जसे की सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे किंवा लाल दिवा ओलांडणे, अशा प्रकारची चलन लोकअदालतीमध्ये निकाली काढली जाऊ शकतात. तसेच जर चालान फक्त सामान्य रहदारीचे नियम मोडण्याशी संबंधित असेल आणि त्यात कोणताही गंभीर गुन्हा किंवा अपघात नसेल, तर चलन निकाली काढण्याची शक्यता जास्त असते. लोकअदालतीच्या दिवशी व्यक्तीने उपस्थित राहणे आवश्यक आहे. तेथे वाहतूक पोलिस आणि न्यायिक अधिकारी सगळेच असतात ते तडजोडीच्या आधारे प्रकरण मिटवतात.
5 / 10
ज्या लोकांकडे वाहतूक चलनाची थकबाकी आहे, त्यांना लोकअदालतीकडून समन्स किंवा नोटीस पाठवली जाते, यामध्ये तारीख आणि वेळ नमूद केली जाते. व्यक्तीला नियोजित तारखेला लोकअदालतीमध्ये हजर राहावे लागते, जेथे न्याय आणि वाहतूक अधिकारी यांच्यासमोर केसची सुनावणी होते.
6 / 10
लोकअदालतीमध्ये न्यायाधीश आणि अधिकारी प्रकरण समजून घेतात आणि तडजोडीच्या आधारे चालानच्या दंडाचा निर्णय घेतात. दंडामध्ये काही शिथिलता दिली जाते, यामुळे व्यक्तीला कमी रक्कम दंड भरावा लागतो. करारानंतर, निश्चित दंड न्यायालयातच जमा केला जातो आणि चलन प्रकरण बंद केले जाते.
7 / 10
लोकअदालतीमध्ये वाहतूक चलन माफ करण्यासाठी किंवा सेटलमेंटसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे जवळे असणे महत्वाचे आहे. हे दस्तऐवज न्यायालयात तुमचे चालान प्रकरण योग्यरित्या स्पष्ट करण्यात मदत करतात.
8 / 10
वाहतूक चलनाची मूळ किंवा छापील प्रत सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यात चलन क्रमांक, तारीख आणि दंडाची रक्कम यासारखी चालान माहिती असते. तुम्ही वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र देखील सोबत ठेवावे, हे तुम्ही त्या वाहनाचे मालक आहात किंवा त्याच्याशी संबंधित आहात हे सिद्ध करू शकते. तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
9 / 10
आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा इतर कोणताही वैध ओळख पुरावा सोबत ठेवा. जर तुमच्या विरुद्ध कोणतेही चलन आधीच असेल किंवा प्रलंबित असेल तर त्याची माहिती देखील तुमच्याकडे ठेवा. यामुळे न्यायमूर्तींना संपूर्ण माहिती मिळेल आणि चलन निकाली काढण्यास मदत होईल.
10 / 10
लोकअदालतीमध्ये येण्यासाठी समन्स किंवा नोटीस सोबत घ्या, जे तुम्हाला न्यायालयाकडून प्राप्त झाले आहे. वाहन विम्याचे कागदपत्रेही जवळ ठेवा.
टॅग्स :carकारPoliceपोलिसCourtन्यायालय