Waris Pathan Pulled Up by twitterati for his Controversial communal Comment
मुस्लीम नेटकऱ्यांनीच घेतली वारिस पठाणांची 'शाळा' By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 1:42 PM1 / 1215 कोटी मुस्लीम 100 कोटी हिंदूंनाही पुरून उरतील, स्वातंत्र्य हिसकावून घेण्याची वेळ आता आली आहे, असं वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधान एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकातील जाहीर सभेत केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. 2 / 12वारिस पठाण यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालाय, त्यांच्या अटकेची मागणीही होतेय. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पठाणांना, माध्यमांशी किंवा जाहीरपणे काहीही न बोलण्याची ताकीद दिली आहे. 3 / 12या पार्श्वभूमीवर, ट्विटरवरून मुस्लीम नेटिझन्सनीही वारिस पठाण यांची 'शाळा' घेतली. आम्ही भारतीय आहोत, आम्हाला तुमच्या 15 कोटींमध्ये मोजू नका, असं अनेक मुस्लीम धर्मीयांनी त्यांना सुनावलंय.4 / 12हिंदू-मुस्लीम भाई-भाई5 / 12वारिस पठाण यांच्या विरोधात #WarisPathanMaafiMango #WariPathanPagalHai असे हॅशटॅग वापरून नेटकऱ्यांनी त्यांचे कान टोचले.6 / 12भारत माझा देश आहे... सारे भारतीय माझे बांधव आहेत... माझ्या देशावर माझे प्रेम आहे...7 / 12कृपया, सर्व मुस्लिमांना एकाच तराजूत तोलू नका!8 / 12डोळ्यात झणझणीत अंजन9 / 12सीएएला विरोधच, पण म्हणून वारिस पठाणांच्या विधानाला पाठिंबा नाही!10 / 12सीएएला विरोधच, पण म्हणून वारिस पठाणांच्या विधानाला पाठिंबा नाही!11 / 12सीएएला विरोधच, पण म्हणून वारिस पठाणांच्या विधानाला पाठिंबा नाही!12 / 12प्रक्षोभक विधानं करून, धार्मिक तेढ निर्माण करणारे नेते आता तरी बोध घेतील का? आणखी वाचा Subscribe to Notifications