Waterfalls in Karnataka are a tourist attraction
कर्नाटकातील धबधबे ठरत आहेत पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:37 PM1 / 8कर्नाटकातलं हुबळी शहर हे वेगानं विकसित होत आहे. व्यवसायाबरोबरच इथे पर्यटनामध्येही वृद्धी आली आहे. हुबळीला चहूबाजूंनी निसर्गाचं वरदान लाभलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. इथली नैसर्गिक दृश्यं, धबधबे, मंदिर आणि ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना आकर्षित करतात. हुबळी शहराला लागूनच निसर्गरम्य धबधबे आहेत. यातील काही धबधबे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. 2 / 8सथोडी धबधबा - हुबळीच्या 75 किलोमीटर अंतरावर सथोडी धबधबा आहे. कर्नाटकातला हा सर्वात सुंदर आणि विशाल धबधबा आहे. इथे वातावरण शांत आणि मनमोहक असतं. या धबधबा 50 फूट उंचावरून कोसळतो. 3 / 8मगोड धबधबा- सथोडी धबधब्यासह आपण हुबळीतल्या मगोड धबधब्यावर जाण्याचाही प्लान आखू शकता. हुबळीच्या मुख्य शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर हा धबधबा स्थित आहे. 4 / 8हा धबधबा 650 फूट उंचावरू कोसळतो. इथले सूर्यास्ताचं दर्शनही आल्हाददायक असतं. 5 / 8जोग धबधबा - हुबळीपासून 190 किलोमीटर अंतरावर जोग धबधबा आहे. कर्नाटकातल्या विशाल धबधब्यांपैकी हा एक आहे. 6 / 8हा धबधबा 900 फूट उंचावरून कोसळतो. त्यामुळे तो पर्यटकांना आकर्षित करतो. हा धबधबा शारावथी नदीला जाऊन मिळतो. 7 / 8सोगल्ला धबधबा- सोगल्ला धबधबा हुबळीपासून 75 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे गेल्यावर ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. कर्नाटकातल्या लोकांमध्येही हा धबधबा लोकप्रिय आहे. 8 / 8या धबधब्याजवळ एक मंदिर आहे. हे सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची वास्तुकला पर्यटकांना प्रभावित करते. आणखी वाचा Subscribe to Notifications