शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठवड्याचे राशीभविष्य : 11 एप्रिल ते 17 एप्रिल 2021, 'या' राशींसाठी आठवडा आनंदाचा, भरभराटीचा अन् समृद्धीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:37 AM

1 / 12
आठवड्यात आपणास दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असून आपल्या प्रियव्यक्तीस ते विवाहासाठी मागणी घालण्याची व त्यांची मागणी मान्य होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या विवाहाचा मार्ग मोकळा होईल. विवाहितांना आपल्या जीवनात भरपूर प्रेमालाप करण्याची संधी प्राप्त झाल्याने त्यांचा जोडीदार त्यांच्यावर खुश होईल. नोकरीच्या बाबतीत अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या आपल्या अनेक इच्छांची पूर्तता होऊन पदोन्नतीच्या वाटा मोकळ्या होतील. प्राप्तीत सुद्धा वृद्धी होईल. एकापेक्षा अधिक ठिकाणाहून पैसा आपल्याकडे येऊ लागल्याने आपण आनंदित व्हाल. व्यापार वृद्धी होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असून त्यांचे अध्ययन सुद्धा चांगले होईल. त्यांना काही नवीन गोष्टी शिकावयास मिळाल्याने त्यांची प्रगती सुद्धा चांगली होईल. ह्या आठवड्यात आरोग्य नाजूक होण्याची शक्यता असल्याने आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपणास नेत्र विकार, अनिद्रा, बेचैनी व पाय दुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
2 / 12
आठवड्याच्या सुरुवातीस आपणास मोठा लाभ होण्याची शक्यता असल्याने आठवड्याची सुरुवात खूपच चांगली होईल. आपली विचार शक्ती खुलून उठेल व आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. ह्या दरम्यान आपण प्रत्येक काम एक आव्हान म्हणून स्वीकारून प्रगती कराल. प्रणयी जीवनात आनंद पसरेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुद्धा आनंद पसरेल. आपण मौज मस्तीसाठी खूप खर्च कराल, जो नंतर आपणास त्रासदायी ठरू शकतो. त्यामुळे खर्च विचारपूर्वकच करावा. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या ज्ञानाचा पूर्ण फायदा घ्यावयास हवा. तसेच आपली कामे सहजपणे व वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावयास हवा. आवश्यकता भासल्यास एखाद्या व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. ह्या आठवड्यात आपली प्रकृती काहीशी नाजूक होऊ शकते. काही जातकांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते.
3 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. ह्या आठवड्यात आपणास अनेक महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील. आपल्या कामात आपणास जे नवीन काम देण्यात आले आहे त्यास पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर असेल. कुटूंबियांच्या गरजांकडे सुद्धा आपणास लक्ष द्यावे लागेल. अशा परिस्थितीत एकाग्रचित्त राहून कामे केल्यास यश नक्कीच मिळेल. आपण धार्मिक कार्यात सुद्धा सहभागी व्हाल. एखादे समाज सेवेचे कार्य सुद्धा करू शकाल. मंदिरात जाऊन देव दर्शनाची संधी मिळेल. आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. असे असले तरी आपण खर्च सुद्धा अपेक्षेहून अधिकच कराल. कौटुंबिक वातावरण आनंदमय असेल. प्रणयी जीवनात प्रेमालापाची संधी मिळेल. आपण आपल्या प्रिय व्यक्तींसह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल.
4 / 12
आठवड्याची सुरुवात व्यावसायिक कार्यातील व्यस्ततेने होईल. आपण सकारात्मक व उत्साहित व्हाल. दरम्यान संवादाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास काही अतिरिक्त धनलाभ होण्याची शक्यता आहे. असा धनलाभ आपली आर्थिक स्थिती बळकट करण्यास हातभार लावेल. आठवड्याच्या मध्यास आपल्या समोर उदभवलेली परिस्थिती आपणास विचारपूर्वक हाताळावी लागेल. ह्या दरम्यान आपण एका मागून एक अशा त्रासाने घेरले जाल. ह्या दरम्यान आपण सुस्त व त्रासलेले असाल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापाऱ्यांना यश प्राप्तीची शक्यता आहे. धनलाभ झाल्याने आपण खुश व्हाल. आठवड्याचे अखेरचे दिवस आपणास अनुकूल असतील. ह्या दरम्यान आपल्या योजनांना आपण प्रभावीपणे अंमलात आणू शकाल. ह्या दिवसात आपणास सर्व चिंता दूर सारून आत्मविश्वासाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आठवड्याचा उत्तरार्ध जास्त अनुकूल आहे.
5 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरवात काहीशा नाजूक स्थितीने होईल. आठवड्याच्या सुरवातीस कोणताही व्यापारी सौदा किंवा करार करू नये. अन्यथा आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, आठवड्याचे मधले व अखेरचे दिवस त्यास अनुकूल आहेत. आपणास नवनवीन व्यापारी सौदे करण्याची संधी मिळून आपला त्यात मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सुद्धा थोडा दिलासा मिळेल. आपणास नशिबाची साथ मिळून कामात यश प्राप्त होईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. प्रणयी जीवन सामान्यच राहील, मात्र विवाहितांच्या जीवनात समजूतदारपणामुळे आनंद पसरेल. आपला जोडीदार आपल्या कामी येऊ शकेल असा एखादा आवश्यक सल्ला सुद्धा आपणास देऊ शकेल. एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे यथोचित परिणाम मिळून त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होऊ शकेल.
6 / 12
हा आठवडा आपल्यासाठी खूपच महत्वाचा असणार आहे. आठवड्यात आपल्या हाती एखादी अचल संपत्ती येऊ शकते. अनेक दिवसांपासून आपणास ज्याची प्रतीक्षा होती ते आपणास मिळालेले असेल. आपल्या कामात प्रगती होईल. व्यापार सुद्धा चांगला होईल. खर्चात थोडी वाढ संभवते, परंतु हि वाढ आपल्या हिताचीच असेल. कारण हे खर्च आपल्यासाठी गुंतवणुकीचे कार्य करणारे असतील. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. प्रकृती थोडी नाजूक होण्याची शक्यता आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. एकमेकांना समजून घेतल्याने आपल्यातील जवळीक वाढेल. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा आठवडा चांगला आहे. त्यांचे प्रणयी जीवन सुखद होऊन विवाहाच्या दिशेने ते प्रगती करू शकतील. कामाच्या ठिकाणी काही लोक आपल्यावर जळत असल्याने ते आपल्या विरुद्ध कट - कारस्थान रचण्याची शक्यता असून आपणास त्यांच्या पासून थोडे सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात आपल्या सासुरवाडीस एखादा कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता असून आपणास अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळू शकेल.
7 / 12
हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या खर्चात अचानकपणे वाढ होऊ लागेल. आपल्या प्रियजनांना खुश ठेवण्यासाठी आपणास महागड्या भेटवस्तू आणाव्या लागतील. मातुला कडील लोकांना भेटण्याची संधी मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपल्यात एकमेकां बद्धलचे आकर्षण वाढीस लागेल. त्यामुळे आपल्यातील जवळीक व प्रणयाराधन वाढेल. प्रेमीजन आपले प्रणयी जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करतील. काही लोकांचे संबंध स्वीकार्य होऊन प्रेम विवाहाच्या दिशेने प्रगती करू शकतील. आरोग्य उत्तम राहील. नोकरीत कष्टाचे चीज होईल. व्यापाऱ्यांचा व्यापार गती घेईल. हा आठवडा नवीन योजनांची अंमल बजावणी करण्यास अनुकूल आहे.
8 / 12
हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपल्या जीवनाचा आनंद उपभोगून सुखद क्षणांचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. आठवड्याच्या मध्यास चिंता व खर्च ह्या दोघांची वाढ होईल, तेव्हा सावध असावे. आठवड्याचा उत्तरार्ध आपणास अनुकूल असेल. आपण आपल्या वैवाहिक जीवनातील ताण - तणाव दूर करण्याचा प्रयत्न कराल व त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकाल. जोडीदार समजूतदारपणा दाखवेल व त्यामुळे नाते अधिक दृढ होईल. प्रेमीजनांनी ह्या आठवड्यातील अनुकूलतेचा भरपूर फायदा घ्यावा. प्रेमालाप होऊन आपल्या नात्यातील प्रेमाची वाढ होईल. आपली प्रकृती चांगली राहील. आपण प्रत्येक काम एक आव्हान समजून कराल. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे. आठवड्यात व्यापार वृद्धी होईल.
9 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपणास आपल्या कुटुंबीयांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. आपल्या घराचे सुशोभीकरण कसे करता येईल ह्यावर त्यांच्याशी चर्चा कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपल्या नात्यात प्रेमालाप व जवळीक वाढेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. आपणास आपल्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळून प्रत्येक कामात तिची / त्याची साथ आपणास मिळत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामात चांगला परिणाम मिळेल. त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. खर्चात कपात होण्याची सुरुवात होईल.
10 / 12
हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण मित्रांच्या सहवासात मौज - मस्ती करण्यात वेळ घालवू शकाल. त्यांच्या सहवासात आपला वेळ कसा गेला हे आपणास समजणार सुद्धा नाही. आपले व्यक्तिगत जीवन समृद्ध होईल. आपणास नवीन मैत्री करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आपण एखादा नवीन टी. व्ही. किंवा फ्रिज खरेदी करू शकाल. घराची आतून व बाहेरून सजावट सुद्धा आपण करवून घेऊ शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा आनंद घेता येईल. आपल्यासाठी कार्यालय सुद्धा घरा प्रमाणे शांतता देण्याचे कार्य करेल व त्यामुळे आपण कामात प्रगती साधू शकाल. व्यापाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांची व कामगारांची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्यामुळेच आपणास चांगला लाभ होऊ शकतो ह्याची जाणीव ठेवावी लागेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या जवाबदाऱ्या समजू शकाल. प्रेमीजनांना मात्र काही अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांनी कोणत्याही बाबतीत घाई न करता शांत राहून मार्गक्रमण करावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.
11 / 12
हा आठवडा आपल्यासाठी उत्तम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीसच धन प्राप्ती होईल. बँकेतील शिल्लक वाढेल. कौटुंबिक व्यापारात उन्नती होईल. पैतृक व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपल्या ज्ञानात वाढ होईल. लोकांना आपले म्हणणे पटेल. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. कुटुंबात सुख - शांती नांदेल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. आपले जीवन समृद्ध होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी उन्नतीदायक आहे. आपल्या व्यापारात खूप मोठी प्रगती साधण्याची संधी मिळेल. आपणास व्यापार वृद्धीसाठी प्रयत्नशील राहावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात समजूतदारपणा असल्याचे दिसून येईल. एकमेकांना समजून घेऊन आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचा खूपच चांगला परिणाम होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करण्याची शक्यता आहे.
12 / 12
हा आठवडा आपणास खूपच चांगला फलदायी ठरणारा आहे. नशिबाची साथ मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपल्या काही योजना फलदायी होऊ लागतील. व्यापार वृद्धी होऊन त्यास गती येईल. आपल्या हाती काही नवीन सौदे लागतील. आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. आपली प्रतिष्ठा वाढेल. प्रकृतीत सुधारणा होईल. आपल्या अति बडबड्या स्वभावामुळे काही लोक आपल्यावर नाराज सुद्धा होऊ शकतील. वैवाहिक जीवनातील ताण - तणावातुन मुक्तता होईल. एकमेकांना समजून घेऊ शाकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाची मागणी घालू शकाल, ज्यात यश प्राप्तीची जास्त शक्यता आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी त्यांना आपली एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष