शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अयोध्येत ढोलताशांच्या गजरात स्वागत, आदित्य ठाकरेंवर फुलांची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 3:08 PM

1 / 7
शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते भगवान श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आज सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचे विमान लखनौ विमानतळावर दाखल झाले.
2 / 7
यावेळी आदित्य ठाकरेंचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. तर, फुलांची उधळणही त्यांच्यावर झाली. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे.
3 / 7
मुंबई, नाशिक आणि पुण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज दिवसभर अयोध्येत शिवसेनेकडून मोठ्याप्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
4 / 7
मी आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. यामध्ये राजकारणाचा कोणताही भाग नाही. हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
5 / 7
श्रीरामाच्या अयोध्या भूमीत मी कोणतेही राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाही. आमच्या हातातून चांगले कार्य घडू दे, एवढीच प्रार्थना श्रीरामाच्या चरणी करणार आहे. यावेळी त्यांनी 'जय सियाराम'चा नाराही दिला.
6 / 7
आदित्य ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन घेणार आहेत.
7 / 7
या दौऱ्यानिमित्ताने बुधवारी रात्री युवासेनेकडून शरयू नदीच्या काठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी मंगळवार सकाळपासून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात लखनऊत दाखल झाले आहेत.
टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या