What is ‘Animal Aadhaar Card’?Know about the benefits of scheme for farmers
‘पशु आधार कार्ड’ म्हणजे काय रे भाऊ?; जाणून घ्या ‘या’ योजनेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 2:57 PM1 / 10ई-गोपाला अॅप सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पशु आधार क्रमांकाचा उल्लेख केला. ते म्हणाले, या अॅपमध्ये प्राण्यांचा आधार (Pashu Aadhaar) ठेवण्याचे काम पूर्ण झाल्यास प्राण्यांविषयीची सर्व माहिती मिळविली जाईल. 2 / 10यामुळे जनावरांची खरेदी-विक्री करणे सोपे होईल. नेमका पशु आधार कार्ड काय हे जाणून घेऊया, वास्तविक, प्राण्यांचे टॅगिंग हे त्यांचे आधार कार्ड आहे. आता देशभरातील प्रत्येक गाय-म्हशीसाठी एक अनोखा ओळख क्रमांक दिला जाईल. 3 / 10या माध्यमातून पशुपालकांना सॉफ्टवेअरद्वारे घरी बसून त्यांच्या जनावरांची माहिती मिळू शकेल. लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय मदत यासह इतर कामे सहजपणे केली जातील.4 / 10पशुधनविषयक माहितीशी संबंधित एक प्रचंड डेटाबेस भारतात तयार केला जात आहे. पशुधनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढच्या दीड वर्षात जवळपास ५० कोटींपेक्षा अधिक गायींच्या मालकांना, पशुची जाती आणि उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पद्धतीने एक अनोखा आयडी (Animal UID Pashu Aadhaar) दिला जाईल. 5 / 10जनावराच्या कानात ८ ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग लावला जाईल. त्याच टॅगवर १२-अंकी आधार क्रमांक छापला जाईल.6 / 10पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री संजीव बालयान यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे ४ कोटी गायी, म्हशींचे आधार कार्ड बनविण्यात आले आहे, तर देशात ३० कोटींपेक्षा जास्त गायी, म्हशी आहेत. मोहिमेतंर्गत त्यांना टॅगिंग केले जाईल. 7 / 10गायी-म्हशींनंतर मेंढ्या, बकरी इत्यादींचा आधार तयार होईल. या कार्डमध्ये युनिक नंबर, मालकाचा तपशील आणि जनावरांच्या लसीकरण आणि प्रजननाची माहिती असेल. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सचिव अतुल चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, शेतकर्यांसाठी पशुपालक हे एटीएम मशीनसारखेच आहे. 8 / 10सध्या दुधासारखे कोणतेही उत्पादन वेगाने पुढे जात नाही. वेगाने चालत नाही. पुढील पाच वर्षांत दुग्ध क्षेत्रातील सध्याची बाजारपेठ १५८ दशलक्ष मेट्रिक टन वरून २९० दशलक्ष मेट्रिक टन होण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितले. 9 / 10चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार भारत सरकारने पशुसंवर्धन क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणजे एका वर्षात एक अब्ज एफएमडी लस देणे. जेणेकरून हे सुनिश्चित करता येईल की गुरेढोरे रोगमुक्त राहतील.10 / 10भारतात दररोज सुमारे ५० कोटी लिटर दुधाचे उत्पादन केले जाते. त्यापैकी सुमारे २० टक्के संघटित व ४० टक्के असंघटित क्षेत्र खरेदी करतात. सुमारे ४० टक्के दूध शेतकरी स्वतः वापरतो. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटक ही भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक राज्ये आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications