What are current trends in home buying? Corona changed everything pdc
नोकरदार, कामगारांनो! घर खरेदीचा सध्या ट्रेंड काय? कोरोनाने सारेच बदलले By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:34 AM1 / 11कोरोनाच्या कहरामुळे अनेकांची जीवनशैली बदलली आहे. शहर-महानगरांचे आकर्षण असलेल्यांनी आपण या मायानगरांपासून दूर कुठेतरी गावात रहायला जावे, असे अनेकांना वाटत आहे. 2 / 11काहींनी नुसताच विचार केला नाही तर टाळेबंदीच्या काळात हे असे दूर कुठेतरी रहायला जाण्याचा विचार प्रत्यक्षात अंमलातही आणला. अजूनही शहरापासून दूर परंतु उपनगरांत स्थलांतरित होण्याचा विचार अनेक जण करत आहेत, हे नक्की.3 / 11कोरोना कहराच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच एक सर्वेक्षण करण्यात आले. 4 / 11८७% लोकांनी ते सध्या ज्या महानगरात रहात आहेत ते सोडून उपनगरात जाण्यास पसंती दिली. १३% लोकांनी अन्य शहरात जाण्याला आपण अधिक प्राधान्य देऊ, असे सांगितले. 5 / 11२६% लोकांनी, ज्यांचे उत्पन्न मध्यम प्रकारचे होते, महासाथीच्या कालावधीतच अन्यत्र स्थलांतर केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. ३२% लोकांनी तर कोरोनाच्या सुरुवातीनंतर वर्षभरातच शहरांमधून गाशा गुंडाळला.6 / 11कोरोनामुळे शहरांतील चित्र बदलले आहे. महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे जीवनशैली महागली आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात घट झाली आहे. 7 / 11या सर्व पार्श्वभूमीवर अनेक जण निम्नशहरांत किंवा उपनगरांत अथवा गावाकडे स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत आहेत. 8 / 11वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे अनेकांनी आपला निवारा अन्यत्र हलविण्याचा विचार चालवला आहे. 9 / 11मुंबई, पुणे आणि कोलकात्यातील ५८ टक्के नागरिकांना निवासी खर्चात १० टक्के वाढ होईल, असे वाटते. 10 / 11बंगळुरूतील १९ टक्के तर चेन्नईतील १८ टक्के लोकांना येत्या १२ महिन्यांत घरखर्चात २० टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 11 / 11अनेक संस्थांनी घरून काम करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना दिल्याने अनेकांनी शहरापासून दूर उपनगरांत वा गावाकडे घर घेण्याचे ठरवले आहे. (स्रोत : नाइट फ्रँक इंडिया सर्व्हे) आणखी वाचा Subscribe to Notifications