शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजकारणाची क्रेझ केवढी! आमदारकीसाठी कोणी डॉक्टरी तर कोणी परदेशातील नोकरी सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 3:55 PM

1 / 7
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टरांपासून खेळाडू, प्राध्यापकांनी आपला पेशा सोडला आहेच, पण परदेशातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून काहीजण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी काहीजणांना 1 कोटी तर काहींना काही लाखांत पगार भेटत होता. एवढे उच्चविद्याभुषित राजकारणात येत आहेत याचे स्वागत आहेच, पण ते आता गल्ली गल्लीमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत.
2 / 7
लंडनमधील पब्लिक रिलेशनची 1 कोटी रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून नौक्षम चौधरी ही महिला हरियाणा विधानसभेच्या आखाड्यात उतरली आहे. ती सर्वात मागास जिल्हा मेवातच्या पुन्हाना मतदारसंघातून ती भाजपाकडून लढत आहे. तिचे वडील निवृत्त न्यायाधीश आणि आई वरिष्ठ अधिकारी आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी ती लंडनहून आली आहे.
3 / 7
वल्लभगड विधानसभा मतदारसंघातून बसपाचा उमेदवार तर पेटीएममधील लाखो रुपयांची नोकरी सोडून आला आहे. अरुण बिसला हा इंजिनिअर होता. आर्मी इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंगमधून त्याने पदवी घेतली आहे. त्याचे आजोबा चौधरी सुमेर सिंह इंग्रजांच्या काळापासून आमदार राहिले आहेत.
4 / 7
झज्जरमधून भाजपाचे उमेदवार डॉ. राकेश कुमार हे तर डेप्युटी सिव्हील सर्जन होते. त्यांनी सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात नशीब आजमावायचे ठरवले आहे. त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच निवृत्ती घेतली. आरएसएसशी जवळीक आहे. गेल्या वेळेलाच त्यांनी निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना स्वेच्छानिवृत्ती मिळाली नव्हती.
5 / 7
लाडवा मतदारसंघातून जजपामधून उमेदवारी मिळालेल्या डॉ. संतोष दहिया कुरुक्षेत्र विद्यापीठामध्ये प्राध्यापिका आहेत. विद्यापीठात सुटी टाकून त्या निवडणूक लढवत आहेत. दहिया 2014 मध्येही बेरी लोकसभा निवडणुकीत लढल्या होत्या. महत्वाचे म्हणजे दहिया या आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपट्टू होत्या.
6 / 7
आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू पाहिलेली बबीता फोगाटने तर अचानकच जजपाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये दाखल झाली. यासाठी तिने पोलिस खात्यातील उप निरिक्षकाची नोकरीच सोडली आहे. ती चरखी दादरीमधून निवडणूक लढवत आहे.
7 / 7
ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्त यानेही डीएसपीची नोकरी सोडत भाजपाच्या तिकीटावर बरोदा मतदारसंघातून उमेदवारी करत आहे.