शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्लीत अजित पवारांच्या उमेदवारांचे काय झाले? डिपॉझिट जप्त केले की कोणाच्या हरण्याला कारण ठरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:30 IST

1 / 6
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३० उमेदवार दिले होते. महाराष्ट्रात महायुतीत भाजपा सोबत असली तरी अजित पवारांनी दिल्लीत वेगळे राहत निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा परत मिळविण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न होता. एनसीपीच्या या ३० उमेदवारांचे काय हाल झाले, भाजपाच्या वादळात आपच्या भल्या भल्या लोकांचे तंबू उडाले, मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती मते मिळाली, असा प्रश्न लोकांच्या मनात येत होता. त्याचा आकडा आला आहे.
2 / 6
दिल्लीत भाजपाच्या खात्यात ४८ जागा जाताना दिसत आहेत. तर आपला २२ जागा मिळताना दिसत आहेत. जिथे काँग्रेसची डाळ शिजली नाही तिथे अजित पवारांच्या पक्षाची काय हालत झाली असेल विचार करा. दिल्ली निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षासह मायावती, औवेसी, नितीश कुमार आणि चिराग पासवानही आपापली ताकद आजमावत होते. यापैकी एकाच्याही हाती काहीही लागलेले नाही.
3 / 6
ओवेसींच्या एमआयएमने दिल्लीच्या दोन जागांवर निवडणूक लढविली. मुस्तफाबादमध्ये एमआयएम तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली, परंतू ओखलामध्ये त्यांच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले आहे.
4 / 6
मायावतींच्या बसपाने दिल्ली निवडणुकीत ६८ उमेदवार उतरविले होते. यापैकी एकही उमेदवार तिसऱ्या क्रमांकाचीही मते मिळवू शकला नाही. बसपाला केवळ ०.६० टक्के मते मिळाली आहेत.
5 / 6
भाजपाने दिल्लीतील ७० पैकी २ जागा लोजपा आणि जदयूला सोडल्या होत्या. देवळीमध्ये चिराग पासवान यांच्या उमेदवाराला ३६६८० मते मिळाली होती. तर जदयूचा उमेदवार १३ हजार मतांनी पिछाडीवर आहे. म्हणजेच या दोन्ही जागा एनडीएने हरलेल्या आहेत. तर ७० जागांवर नोटाला 0.6% टक्के मतदान झाले आहे.
6 / 6
मायावतींप्रमाणे अजित पवारांनीही भरपूर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार उतरविले होते. सर्वांची हालत बेहाल झाली आहे. अजित पवारांच्या ३० उमेदवारांना मिळून एकूण मतदानाच्या 0.03% टक्के मतदान झाले आहे. ना हे उमेदवार कोणाला हरवू शकले ना कोणाला जिंकवू शकले आहे. एवढेच नाही तर या उमेदवारांना नोटाएवढीही मते मिळालेली दिसत नाहीत. या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारdelhi electionदिल्ली निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा