शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेल्वेतील TTE आणि TC मध्ये काय असतो फरक? माहीत नाही? मग जाणून घ्या, प्रवासात होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 4:39 PM

1 / 5
भारतीय रेल्वे हा भारतातील प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. क्वचितच कुणीतरी रेल्वेप्रवास केला नसेल. प्रवासामध्ये आपली गाठ TTE आणि TC या रेल्वेतील तिकीट तपासणी करणाऱ्यांशी पडली असेलच. पण TTE आणि TC मध्ये काय फरक असतो हे तुम्हाला माहिती आहे का? या दोघांमध्येही खूप फरक असतो. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे.
2 / 5
प्रवास करताना अनेकदा ट्रेनमध्ये आणि अनेकदा प्लॅटफॉर्मवर तिकिटांची तपासणी केली जाते. टीटीईचा फुल फॉर्म ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असा आहे. टीटीईचं मुख्य काम ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांकडून तिकिटांची तपासणी करणं हे असतं. अनेकदा या अधिकाऱ्यांकडून ओळखपत्रांची मागणी केली जाते.
3 / 5
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करणं हेसुद्धा टीटीईचं काम असतं. तसेच कुठल्याही ट्रेनमध्ये रिक्त असलेल्या जागांबाबत निर्णय घेण्याचा अधिकारही टीटीईला असतो. ते ती सिट कुणालाही देऊ शकतात.
4 / 5
तर टीसीचा फुल फॉर्म हा तिकीट कलेक्टर असा आहे. टीसीचं कामही टीटीईप्रमाणेच असतं. मात्र टीटीई आणि टीसीमधील मुख्य फरक म्हणजे टीटीईप्रमाणे टीसी हा ट्रेनच्या आतमध्ये जाऊन तिकीट तपासू शकत नाही. त्यांचं काम हे ट्रेनच्या बाहेरून तपासणी करण्याचं असतं. ते प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासत असतात. त्यांची मुख्य ड्युटी ही प्लॅटफॉर्मच्या गेटवर असते.
5 / 5
टीसी प्लॅटफॉर्म तिकीटची तपासणीसुद्धा करतात. मात्र या दोघांचीही नियुक्ती ही रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून केली जाते. दोन्ही याच विभागाचे कर्मचारी असतात.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे