शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांचा पगार किती? गाडी, बंगला सारख्या सुविधाही मिळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 07:32 IST

1 / 8
यूपीएससी परीक्षा देणाऱ्या लाखाे विद्यार्थ्यांमधून काही जणांचीच आयएएस पदावर निवड हाेते. आयएएस पद मिळाल्यानंतर पूजा खेडकरला प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुण्यात पाठविले हाेते. तिथे तिने गाडी, बंगाला, कक्ष आदी व्हीआयपी सुविधा मागितल्या. त्यावरून वाद निर्माण झाला.
2 / 8
प्रशिक्षणार्थी सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण किंवा प्रोबेशनचा कालावधी पूर्ण हाेईपर्यंत काही माेजक्याच सुविधा मिळतात.आयएस पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. दाेन वर्षांचा प्रशिक्षणाचा कालावधी असताे. ताे वाढविला जाऊ शकताे. निळा दिवा वापरता येत नाही.
3 / 8
प्रशिक्षणानंतर त्यांना फिल्ड ट्रेनिंगसाठी एखाद्या जिल्ह्यात प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पाठविले जाते.
4 / 8
तेथे त्यांची नियुक्ती प्रशिक्षणार्थी म्हणूनच राहते. त्यामुळे आयएएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळत नाहीत.
5 / 8
आयएएस अधिकाऱ्यांना ५६,१०० एवढे मूळ वेतन मिळते. सुरुवातीच्या प्रशिक्षणादरम्यान उत्तराखंड येथील अकॅडमीमध्ये १० हजार रुपये भाेजनाचे त्यातून कापण्यात येतात.
6 / 8
वाहन व इतर भत्ते प्रशिक्षण काळात मिळत नाहीत. प्रोबेशन अवधी पूर्ण झाल्यानंतरच निवास आणि वाहन सुविधा देण्यात येते.
7 / 8
आयएएस अधिकारी झाल्यानंतर त्यांना डीए, घरभाडे भत्ता, वैद्यकीय तसेच प्रवास भत्ता मिळताे.
8 / 8
कनिष्ठ, वरिष्ठ आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या श्रेणीनुसार वेतन, बंगला, खानसामा, निळा दिवा तसेच इतर सुविधा मिळतात.
टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग