शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनमधील 'मंकी बी व्हायरस'चा भारताला किती धोका, याबाबत काय उपोययोजना सुरू आहेत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 2:43 PM

1 / 13
नवी दिल्‍ली: भारतात कोरोनाची दुसरी लाट अजून कमी झालेली नाही. यातच कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
2 / 13
या तिसऱ्या लाटेदरम्यान परदेशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटने भारताची चिंता वाढवली आहे. तर, चीनमधून मंकी बी किंवा मंकी व्हायरसच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
3 / 13
अशा परिस्थिती भारतात माकडांची संख्या जास्त असल्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे. भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये माकडांचा आणि माणसांचा संपर्क येतो.
4 / 13
अनेक ठिकाणी माकडाने हल्ला केल्याच्या किंवा चावल्याच्या घटना घडतात. त्यामुळे भारतात मंकी व्हायरसचा किती धोका आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे ?
5 / 13
नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (NCDC) चे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंह यांनी सांगितलं की, चीनमध्ये मंकी व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
6 / 13
भारतात या आजारामुळे मृत्यू झाल्याचे कुठलेही प्रकरण समोर आलेले नाही. पण, कोरोना काळात अशाप्रकारचे कुठलेही व्हायरस भारतात येऊ नये, यासाठी आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.
7 / 13
डॉ. सुजीत पुढे म्हणाले की, 'एनसीडीसीने मंकी बी आणि जनावरांमधून माणसात येणाऱ्या रोगांच्या पार्श्वभूमीवर अॅनिमल हसबंडरी आणि वाइल्‍ड लाइफशी संवंधित संघटनांच्या लोकांसोबत एक वर्कशॉप सुरू आहे.
8 / 13
या वर्कशॉपमध्ये जनावरांमधून माणसात पसरणाऱ्या रोगांवर चर्चा सुरू आहे. यातून अनेक महत्वाच्या बाबी समोर येऊ शकतात.
9 / 13
सध्या भारतातीत माकडांमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस आहे का नाही, हे जाणून घेण्याची गरज आहे. जर माकडांमध्ये अशाप्रकारचा व्हायरस नसेल, तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही.
10 / 13
जोपर्यंत आपण मंकी व्हायरसशी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात जाणार नाहीत, तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत.
11 / 13
डॉ. सुजीत सांगतात की, भारतात माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भारतातही माकडांमधून माणसात एखादा आजार जातोय का, याचा अभ्यास सुरू आहे.
12 / 13
एनसीडीसीने नकतच यासंबंधी अॅनिमल हसबंडरी आणि वाइल्‍ड लाइफशी संबंधित जाणकारांकडून यासंबंधी माहिती मागवली आहे. याशिवाय, इतर जूनोटिक आजारासंबंधीही माहिती देण्यास सांगितले आहे.
13 / 13
डॉ. सुजीत सांगतात की, भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत मतमतांतर आहे, पण माझ्या मते ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येईल. यापासून वाचण्यासाठी सरकार, जिल्हा प्रशासनाला काम करावे लागेल.
टॅग्स :chinaचीनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMonkeyमाकड