शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानी हवाई हद्दीत ४६ मिनिटं काय करत होते PM नरेंद्र मोदींचं विमान?; पाकमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 2:47 PM

1 / 10
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर केला होता. पाकिस्तानी मीडिया आऊटलेट जियो न्यूजनं नागरी उड्डाण मंत्रालयाचा हवाला देत ही माहिती समोर आणली आहे. पाकिस्तानी माध्यमात या बातमीनं खळबळ माजली आहे.
2 / 10
पाकिस्तानातील नागरी उड्डाण विभागाशी निगडीत सूत्रांच्या हवाल्याने जियो न्यूजनं म्हटलंय की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंडवरून नवी दिल्लीला प्रवास करताना पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून त्यांनी प्रवास केला. पंतप्रधान मोदींचे विमान चितरालमार्गे पाकिस्तानी हवाई हद्दीत दाखल झाले आणि इस्लामाबाद, लाहोरवरून ते भारतात गेले असं सांगण्यात येत आहे.
3 / 10
पंतप्रधान मोदी यांच्या विमानाने सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पाकिस्तानी हवाई हद्दीत प्रवेश केला. जवळपास ४६ मिनिटे ते पाकिस्तानी हवाई हद्दीत होते. ११.०१ मिनिटांनी ते पाकिस्तानी हवाई क्षेत्राच्या बाहेर गेले. भारताच्या अमृतसर हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी ते इस्लामाबाद आणि लाहोरच्या हवाई हद्दीतून प्रवास करत होते.
4 / 10
पाकिस्तानच्या प्रमुख वृत्तपत्र डॉनने आपल्या बातमीत लिहिलं आहे की, भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात असताना सदिच्छा संदेश देण्याची परंपरा पाळली नाही, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणावाच्या चर्चेला उधाण आले आहे.
5 / 10
डॉनने विमान वाहतूक उद्योगातील एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, सदिच्छा संदेश पाठवणे ही एक परंपरा आहे आणि सक्ती नाही. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना यामुळे भारतातील टीकाकारांकडून त्रास सहन करावा लागू शकतो असं छापण्यात आले आहे.
6 / 10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे गेले होते. युद्धामुळे विमानाने जाण्याऐवजी ते पोलंडमधील वॉर्सॉला गेले, तेथून ते पुढील प्रवास ट्रेनने करत कीवला पोहोचले होते.
7 / 10
पंतप्रधान मोदी युक्रेनच्या राजधानीत सात तास थांबले, जिथे त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी पीएम मोदींनी रशिया युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित व्हावी ही भारताची भूमिका असल्याचं स्पष्ट केले.
8 / 10
त्यानंतर यूक्रेनमधून परतताना PM नरेंद्र मोदी कीवहून पुन्हा ट्रेनने वॉर्साला गेले आणि विमानाने नवी दिल्लीला परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून गेले. इस्लामाबाद, लाहोर मार्गे मोदींनी भारतात प्रवेश केला.
9 / 10
भारतीय लढाऊ विमानांनी आंतरराष्ट्रीय सीमेचे आणि हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यानंतर पाकिस्तानने २६ फेब्रुवारी २०१९ नंतर आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली. नंतर मार्चमध्ये, त्यांनी आपले हवाई क्षेत्र अंशतः उघडले परंतु भारतीय उड्डाणांसाठी त्यावर बंदी घातली आहे.
10 / 10
काश्मीर वादावर वाढलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानने त्याच वर्षी पंतप्रधान मोदींना जर्मनीला जाण्यासाठी त्यांची हवाई हद्द वापरण्याची विनंती नाकारली होती. मात्र, दोन वर्षांनंतर पाकिस्तानने भारतीय पंतप्रधानांच्या नॉन-स्टॉप फ्लाईटला त्यांच्या हवाई क्षेत्रातून अमेरिकेकडे जाण्यासाठी परवानगी दिली होती.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तान