Who Buys Homes After reading this information you will get to know in detail
घरांची खरेदी नेमकी कोणाकडून केली जातेय? 'ही' माहिती वाचून तुम्हीही चक्रावून जाल... By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 8:58 AM1 / 8एका खासगी संस्थेने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. झपाट्याने शहरीकरण होत असल्यामुळे विभक्त परिवारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 2 / 8लोकसंख्याही वाढत आहे. हे दोन्ही घटक घरांच्या बाजारपेठेसाठी अनुकूल घटक आहेत. ‘ॲनारॉक’च्या अभ्यासातून घर खरेदीदारांत नवे कल आणि प्राधान्ये आढळून आली आहेत. त्यानुसार विकासक आपली धोरणे ठरवत आहेत.3 / 8सुधारणा व कोरोना साथीनंतर घरांची बाजारपेठ ही राहण्यासाठी घरे घेणारे लोकच चालवत असल्याचे आढळले आहे. गुंतवणूकदार आणि सटोडिये या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले गेले आहेत. घरांच्या किमती सीमा-बंधित (रेंज-बाउंड) असल्याचेही या अहवालात आढळून आले आहे.4 / 8७९ टक्के प्राधान्य हे मध्यम ते उच्च श्रेणीतील घरांना खरेदीदार देत आहेत. ३८ टक्के २ बीएचके घरांचा एकूण विक्रीतील वाटा आहे. २६ टक्के ३ बीएचके घरांचा वाटा आहे.5 / 8६८ टक्के घर खरेदीदारांतील हिस्सेदारी नोकरदार वर्गाची आहे. हे प्रमाण सर्वाधिक आहे. २६ टक्के घर खरेदीतील हिस्सेदारी व्यावसायिक व धंदेवाईकांची. ९० टक्के घरांची बाजारपेठ राहण्यासाठी घरे घेणाऱ्यांनी व्यापली आहे.6 / 8१०% गुंतवणुकीसाठी, तर ९०% राहण्यासाठी.7 / 8६८ टक्के नोकरदार वर्ग, १८ टक्के बिझनेस, ०८ टक्के प्रोफेशनल्स, तर ६ टक्के इतर8 / 8१ आरके- ६ टक्के, १ बीएचके- १३ टक्के, २ बीएचके- ३८ टक्के, ३ बीएचके- २६ टक्के, ४ बीएचके- ९ टक्के, भूखंड- ७ टक्के, रो हाऊस- १ टक्के. (स्त्रोत : ॲनारॉक रिसर्च’ या संस्थेने केलेले संशोधन) आणखी वाचा Subscribe to Notifications