who does indian government pay highest salary pm president cji vp salary
भारत सरकार सर्वात जास्त वेतन कोणाला देते? पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान, त्यांच्या आधी कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 4:13 PM1 / 6भारत सरकारकडून कोणत्या व्यक्तीला सर्वात जास्त वेतन दिले जाते? ती व्यक्ती कोणत्या पदावर आहे? तिला किती वेतन दिले जाते? हे तुम्हाला माहिती आहे का? तर केंद्र सरकारकडून वेतन घेण्याच्या बाबतीत पंतप्रधान पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या पुढे सरन्यायाधीश, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती येतात.2 / 6भारत सरकार सर्वाधिक वेतन राष्ट्रपतींना देते. राष्ट्रपतींना दरमहा ५०,००० लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय सर्व प्रकारचे भत्ते, सरकारी निवासस्थान म्हणून राष्ट्रपती भवन, सरकारी वाहने, २४ तास सुरक्षा कर्मचारी आणि मोठा कर्मचारी स्टाफ असतो.3 / 6वेतनाच्या बाबतीत उपराष्ट्रपती दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना दरमहा ४०,००० लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय अनेक प्रकारचे भत्ते, मोठमोठे बंगले, आलिशान गाड्या, २४ तास सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सुविधा आदी सुविधाही उपलब्ध आहेत.4 / 6राज्यपाल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारत सरकार राज्यपालांना ३५,०००० लाख रुपये मासिक वेतन देते. याशिवाय प्रत्येक राज्यात राज्यपालांसाठी आलिशान बंगला, सुरक्षा कर्मचारी, नोकर आदी सुविधाही उपलब्ध आहेत.5 / 6चौथ्या क्रमांकावर भारताचे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीशांना महिन्याला २८,०००० लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय राजधानी दिल्लीत भाड्याने मोफत बंगला, २४ तास सुरक्षा कर्मचारी, कार यासारख्या सुविधा दिल्या जातात.6 / 6याचबरोबर, वेतनाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान पाचव्या क्रमांकावर येतात. त्यांना दरमहा १.६६ लाख रुपये पगार मिळतो. ज्यामध्ये विविध प्रकारचे भत्ते देखील समाविष्ट आहेत. सरकारी निवासस्थानाव्यतिरिक्त, त्यांना एसपीजी सुरक्षा, विशेष जहाजे, बुलेट प्रूफ वाहने आणि सर्व प्रकारच्या सुविधा देखील पुरवल्या जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications