शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची चिंता मिटली; यूकेच्या रिपोर्टमधून आली दिलासादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 8:33 AM

1 / 10
भारतात आतापर्यंत कोरोना लसीचे ४९ कोटीहून अधिक डोस देण्यात आल्याची माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. संध्याकाळी ७ पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ५०.२९ लाख अधिक लोकांना डोस देण्यात आले.
2 / 10
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १८ ते ४४ वयोगटातील २७ लाख २६ हजार ४९४ लोकांना गुरुवारी लसीचा पहिला डोस देण्यात आला तर ४ लाख ८१ हजार ८२३ लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण १८ ते ४४ वयोगटात १६ कोटी ९२ लाख ६८ हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
3 / 10
तर १० कोटी ७ लाख ५३७ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात १८ ते ४४ वयोगटातील एक कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
4 / 10
ब्रिटनच्या एका स्टडीत दावा करण्यात आला आहे की, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना कोरोना संक्रमण होण्याचा धोका ३ पटीने कमी आहे. ब्रिटनच्या या स्टडीमुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची चिंता मिटली आहे.
5 / 10
कोरोनावर यूकेच्या सर्वात मोठ्या स्टडीपैकी एक कम्युनिटी ट्रांसमिशनच्या रियल टाइम असेसमेंट(REACT-1) स्टडीत बुधवारी सांगितले की, इंग्लंडमध्ये संक्रमण ०.१५ टक्क्यापासून चार पटीनं वाढून ०.६३ इतकं झालं आहे. परंतु १२ जुलैपासून रुग्णसंख्येत कमी दिसून आली.
6 / 10
इंपीरियल कॉलेज लंडन आणि इप्सोस मोरी विश्लेषणात २४ जून ते १२ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये संशोधनात भाग घेतलेल्या ९८ हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांनी सूचना दिली की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकामुळे दुसऱ्यांमध्ये संक्रमण पसरवण्याची शक्यता फार कमी आहे.
7 / 10
यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद म्हणाले की, आमचं लसीकरण अभियान सुरक्षेची भिंत निर्माण करत आहे. ज्याचा अर्थ असा आहे आम्ही निर्बंध सतर्कतेने कमी करू शकतो आणि पुन्हा पूर्वीसारखं जगू शकतो. परंतु काळजी घेणे गरजेचे आहे कारण आपल्याला व्हायरससोबत राहणं शिकायला हवं.
8 / 10
कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरोधात प्रभावी लस - पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या डेटानुसार, यूकेमध्ये देण्यात येणारी कोरोना लस ही व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटविरोधात खूप प्रभावी आहे. फायजर लस ही ९६ टक्के प्रभावी आहे. तर एस्ट्राजेनेका वॅक्सीन दोन्ही डोसनंतर ९२ टक्के प्रभावी ठरतेय.
9 / 10
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अंदाजानुसार, देशात लसीकरणामुळे २ कोटी २० लाख लोकांना संक्रमित होण्यापासून, ५२६०० जणांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून आणि ३५,२०० ते ६०००० हजार लोकांना मृत्यूपासून रोखले आहे.
10 / 10
या रिजल्टवरून हे कळतं की, ज्या लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना कोरोना संक्रमण होण्याचा धोका ३ पटीने कमी आहे. यूके आरोग्य विभागाने तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर १६ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांचं लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस