शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NDAच्या सभेत स्टेजवर मानाचं स्थान मिळालेली 'ती' एकमेव महिला कोण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 4:16 PM

1 / 9
NDA Meeting, PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला हाती आले. भाजपाला या निकालात अपेक्षित यश मिळू शकले नाही. २७२ हा बहुमताचा आकडा भाजपा गाठू शकेल असा अनेकांना विश्वास होता. पण भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाप्रणित NDA महायुतीने मात्र २९२ चा आकडा गाठला आणि बहुमत मिळाले. त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला.
2 / 9
पण यावेळी मोदींच्या भाजपाला NDAतील घटक पक्षांशीही साथ असणे गरजेचे आहे. त्यामुळे आज झालेल्या संसदीय बैठकीत भाजपाच्या घटक पक्षांतील प्रमुख व्यक्तींना स्टेजवर मानाचे स्थान मिळणे अपेक्षितच होते. नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार यांसारखे नेतेमंडळी मोदींसह स्टेजवर होते. त्यात विशेष बाब म्हणजे, या सर्व खास निमंत्रितांमध्ये स्टेजवर एकमेव महिला प्रतिनिधीला स्थान मिळालेले होते. जाणून घेऊया त्या महिलेबद्दल...
3 / 9
भाजपाप्रणित NDA ने बहुमताचा आकडा गाठला. त्यानंतर नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यावरही शिक्कामोर्तब झाले. आज राजनाथ सिंह यांनी मोदींच्या पंतप्रधान पदाचा प्रस्ताव संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मांडला. त्याला अमित शाह, नितीन गडकरी आणि इतर घटक पक्षाच्या नेतेमंडळींनी समर्थन दिले.
4 / 9
यावेळी स्टेजवर तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, एलजेपी प्रमुख चिराग पासवान, हिंदुस्थानी आवाम मोर्चा प्रमुख जीतन राम मांझी यांच्यासोबतच एकमेव महिला उपस्थित होती. त्या म्हणजे अपना दल च्या अनुप्रिया पटेल. (Anupriya Patel)
5 / 9
अनुप्रिया पटेल या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मिर्झापूर मतदारसंघातून अपना दल (सोनेयलाल) पक्षाच्या निवडून आलेल्या खासदार आहे. १९५२ ते १९८९ पर्यंत मिर्झापूर लोकसभा जागेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. १९९० नंतर येथे कधी सपा, कधी बसपा तर कधी काँग्रेसला यश मिळायचे. पण एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मिर्झापूरमधून २०१४ आणि २०१९ नंतर सलग तिसऱ्यांदा अनुप्रिया पटेल यांनी विजय मिळवला आहे.
6 / 9
अपना दल च्या अनुप्रिया पटेल यांना ४,७१,६३१ मते मिळवली. तर समाजवादी पक्षाचे उमेदवार रमेश चंद बिंद यांना ४,३३,८२१ मते मिळाली. अनुप्रिया यांनी सपा उमेदवार रमेश चंद बिंद यांचा ३७,८१० मतांनी पराभव केला. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बसपा उमेदवार मनीष त्रिपाठी यांना १,४४,४४६ मते मिळाली.
7 / 9
अनुप्रिया सिंग पटेल या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. २०१६ पासून त्या अपना दल (सोनेयलाल) पक्षाच्या अध्यक्षा आहेत. २०१६ ते २०१९ या काळात त्या भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. ७ जुलै २०२१पासून त्या मोदी सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री होत्या. २०१४ पासून त्या लोकसभेत मिर्झापूरचे प्रतिनिधित्व करतात. तत्पूर्वी वाराणसीमधील रोहनिया मतदारसंघातून त्या विधानसभा सदस्य होत्या.
8 / 9
अनुप्रिया पटेल या सोनलाल पटेल यांची कन्या आहेत. सोनेलाल पटेल यांनी उत्तर प्रदेशमध्ये आपना दल (सोनेलाल) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. अनुप्रिया यांचे शिक्षण कानपूर विद्यापीठात झाले. त्यांच्याकडे मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी आहे. त्यांनी MBA केले असून अमिटी विद्यापीठ शिक्षिका म्हणून काम केले आहे.
9 / 9
ऑक्टोबर २००९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर अनुप्रिया या अपना दल च्या अध्यक्षा झाल्या. २०१२ मध्ये त्या वाराणसीतील रोहनिया मतदारतून विधानसभेवर गेल्या. २०१४ साली अपना दल (एस) ने भाजपाशी युती करून निवडणूक लढली. तेव्हापासून सलग तीन वेळा अनुप्रिया या मिर्झापूरमधून खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षातून केवळ त्या एकमेव खासदार निवडून आल्या आहेत.
टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabhaलोकसभाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशmirzapur-pcमिर्जापुरNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४