शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अदानी 'गडगडले' तरी पाठीशी खंबीरपणे उभी ठाकलीय पत्नी, कोण होती? लग्नापूर्वी काय करायची....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 1:35 PM

1 / 11
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावरुन थेट २१ व्या स्थानापर्यंत खाली घसरलेले भारताचे उद्योगपती गौतम अदानी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये मोठी पडझड पाहायला मिळत आहे. यामुळे अदानींच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.
2 / 11
गौतम अदानी नेहमीच लाइमलाइटमध्ये राहिले आहेत. पण त्यांची पत्नी क्वचितच प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्या प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करतात. आपली पत्नीच आपला मोठा आधारस्तंभ आहे असं गौतम अदानींनीही बोलून दाखवलं आहे.
3 / 11
अदानींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की आपल्या प्रगतीसाठी पत्नी प्रिती अदानी यांनी आपल्या करिअरची बाजी लावली होती. तसंच त्यांनी लग्नावेळीचीही एक गोष्ट सांगितली. ज्यावेळी प्रिती यांच्यासोबत विवाह निश्चित करण्यासाठी गौतम अदानी त्यांना भेटले तेव्हा ते काहीच बोलले नव्हते.
4 / 11
गौतम अदानी आणि प्रिती यांचं अरेंज मॅरेज आहे. गौतम अदानी लहानपणापासूनच खूप लाजाळू स्वभावाचे राहिले आहेत. 'मी तर अडाणी माणूस आणि ती डॉक्टर मग काय मी शांत राहणंच त्यावेळी योग्य समजलं होतं. आमची जोडी थोडी मिसमॅच होती', असं गौतम अदानी म्हणाले होते.
5 / 11
मीडिया रिपोर्टनुसार गौतम आणि प्रिती यांचं लग्न त्यांच्या कुटुंबीयांकडूनच निश्चित करण्यात आलं होतं. प्रिती यांचा जन्म मुंबईचा आहे. त्यानंतर त्या अहमदाबादला स्थायिक झाल्या. काही काळ त्या आपल्या कुटुंबीयांसोबत अमेरिकेत देखील राहिल्या आहेत.
6 / 11
प्रिती या अभ्यासात फार हुशार होत्या. त्यांनी गर्व्हमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पीटल अहमदाबाद मधून डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं आहे. पण लग्नानंतर त्यांना आपलं करिअर सोडावं लागलं. लग्नानंतर १९९६ त्या गौतम अदानी यांचा एनजीओ अदानी फाऊंडेशनच्या त्या चेअरपर्सन बनल्या.
7 / 11
करिअरची बाजी लावल्याचं कोणतंही दु:ख किंवा कमीपणा प्रिती यांना नाही. गौतम अदानी यांच्या ६० व्या वाढदिवशी एक खास ट्विट प्रिती यांनी केलं होतं. '३६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मी माझं करिअर बाजूला ठेवलं आणि गौतम अदानींसोबत नव्या यात्रेला सुरुवात केली. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला खूप सन्मान आणि अभिमान वाटतो', असं ट्विट प्रिती अदानी यांनी केलं होतं.
8 / 11
एका मुलाखतीत प्रिती अदानी म्हणाल्या होत्या की जेव्हा त्या निराश किंवा नैराश्यात असतात तेव्हा गौतम अदानी त्यांच्या कोणत्याही समस्येवर उत्तम तोडगा घेऊन येतात. ज्या दिवशी मला जाणीव झाली की एक डेन्टिस्ट म्हणून मी मर्यादित लोकांचीच सेवा करू शकते. पण एका फाऊंडेशनच्या माध्यमातून मी लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. हाच विचार मी केला आणि करिअर सोडलं, असं प्रिती अदानी म्हणाल्या.
9 / 11
गौतमी अदानी यांनीही आपल्या यशाचं श्रेय पत्नी प्रिती यांना दिलं आहे. 'प्रितीजी माझा आधारस्तंभ आहेत. त्या कुटुंब, दोन मुलं, माझी नात यांनाही सांभाळते. तसंच त्या फाऊंडेशनचंही काम पाहतात. यासोबतच त्या डॉक्टर देखील आहेत. पण त्यांनी डॉक्टरकी सोडून मला पूर्णपणे पाठिंबा द्यायचं ठरवलं. त्यांनी कुटुंब सांभाळलं. मुलांना मोठं केलं आणि जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा फाऊंडेशनची जबाबदारी हाती घेतली', असं गौतम अदानी म्हणाले.
10 / 11
प्रिती अदानी आजही दिवसातील ७ ते ८ तास अदानी फाऊंडेशनसाठी काम करतात. प्रिती यांच्या नेतृत्त्वात अदानी फाऊंडेशनच्या विकास होत असल्याचंही गौतम अदानी म्हणाले होते.
11 / 11
अदानी फाऊंडेशनला पुढे घेऊन जाण्यात प्रिती यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. अदानी फाऊंडेशनची स्थापना झाली त्यावेळी फक्त दोन कर्मचारी कंपनीत होते. आज फाऊंडेशनच्यावतीनं देशभरात जवळपास दरवर्षी ३२ लाख लोकांना मदत केली जाते. शिक्षण, आरोग्य, दैनंदिन जीवन विकास आणि पायाभूत सोयींच्या विकासावर अदानी फाऊंडेशनद्वारे काम केलं जातं.
टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानी