Who is Morari Bapu, whose ‘Ram Katha’ was attended by Rishi Sunak in UK?
कोण आहेत मोरारी बापू? ज्यांच्यासमोर ब्रिटनचे पंतप्रधानही झाले नतमस्तक! By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 4:53 PM1 / 14मोरारी बापू हे देशातील प्रसिद्ध रामकथा वाचकांपैकी एक आहेत. ते देशातच नव्हे तर जगभर रामकथेचे आयोजन करतात. मोरारी बापू यांची रामकथा ऐकायला हजारो-लाखो भाविक एकत्र येतात. 2 / 14मोरारी बापू मूळचे गुजराती आहेत. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ रोजी गुजरातमधील महुआजवळील तलगर्दजा येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोरारिदास प्रभुदास हरयाणवी. त्यांच्या आईचे नाव सावित्री बेन आणि वडिलांचे नाव प्रभुदास बापू हरयाणवी आहे. ते लोकांमध्ये मोरारी बापू या नावाने प्रसिद्ध आहेत.3 / 14मोरारी बापूंना आठ भावंडे आहेत, त्यांना सहा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. मोरारी बापू हे आपल्या सर्व भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव नर्मदाबेन आहे. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. 4 / 14मोरारी बापू सध्या गुजरातमधील तलगरजाडा येथील चित्रकुटधाम ट्रस्टमध्ये राहतात. त्यांनी जुनागढच्या शाहपूर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय, मोरारी बापू यांच्याशी संबंधित दहा गोष्टी जाणून घ्या....5 / 14१) मोरारी बापूंनी १९६० साली वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रामकथा वाचली होती, ही कथा त्यांनी त्यांच्या तालगर्दजा गावातील राम मंदिरात सांगितली होती.6 / 14२) मोरारी बापूंनी भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई यासह विविध देशांतील ९०० हून अधिक रामकथा कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असून त्यांनी कथा वाचन केले आहे.7 / 14३) मोरारी बापू रामकथेसाठी १५ ऑगस्ट रोजी केंब्रिज विद्यापीठ परिसरात पोहोचले. यादरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही रामकथा ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मोरारी बापू यांच्यासमोर ऋषी सुनक नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले.8 / 14४) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक बड्या व्यक्ती मोरारी बापूंच्या रामकथा वाचनात सहभागी झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फकीर असे पहिल्यांदा मोरारी बापूंनी म्हटले होते.9 / 14५) मोरारी बापूंची खास गोष्ट म्हणजे ते आपल्या कमाईतील बहुतांश भाग दान करतात. उत्तराखंड आपत्तीच्या वेळी त्यांनी एक कोटी रुपये दान केले होते.10 / 14६) २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर मोरारी बापूंनी प्रत्येक शहीदाच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.11 / 14७) मोरारी बापू म्हणतात की, त्यांना कोणत्याही सुखसोयींची गरज नाही. त्यांना साधे जीवन जगणे आवडते. ते एका साध्या घरात राहतात.12 / 14८) मोरारी बापू लहानपणी आजी-आजोबांसोबत खूप वेळ घालवत असत. त्यांचे आजोबा त्यांना रामचरितमानसच्या चौपाइयां शिकवत होते.13 / 14९) गुजरातमधील महुआ येथे दरवर्षी मुस्लिम समुदाय याद-ए-हुसैन नावाचा कार्यक्रम आयोजित करतो. या कार्यक्रमाला मोरारी बापू नेहमीच प्रमुख पाहुणे म्हणून जातात.14 / 14१०) मोरारी बापूंनी आजपर्यंत आपला वाढदिवस साजरा केलेला नाही. एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान त्यांनी याचा खुलासा केला. त्यांनी सांगितले होते की, ते कधीही वाढदिवस साजरा करत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications