Who is the richest and poorest MLA in the country?; Know About ADR Report
देशातील सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदार कोण?; संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 2:12 PM1 / 10कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत सर्वात टॉपला आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्न्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात श्रीमंत आमदारांची यादी देण्यात आली आहे. 2 / 10रिपोर्टनुसार, KPCC अध्यक्ष डीके शिवकुमार हे १४१३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. यासोबतच आश्चर्यकारक बाब म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या टॉप २० यादीत कर्नाटकातील १२ आमदारांचा समावेश आहे. 3 / 10ADR अहवालात असे म्हटले आहे की कर्नाटकातील १४% आमदार अब्जाधीश आहेत (रु. १०० कोटी), जे देशातील सर्वाधिक आहे. राज्यातील आमदारांची सरासरी संपत्ती ६४.३ कोटी इतकी आहे या रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 4 / 10टॉप ३ च्या नावांबद्दल बोलायचे झाले तर तिन्ही आमदार कर्नाटकचे आहेत. डीके नंतर दुसरे सर्वात श्रीमंत अपक्ष आमदार आणि उद्योगपती केएच पुट्टास्वामी गौडा आहेत. बंगळुरूपासून ८० किमी अंतरावर असलेल्या गौरीबिदानूरचे ते आमदार आहेत. गौडा यांच्याकडे १२६७ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांच्यावर ५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. 5 / 10तिसरे सर्वात श्रीमंत आमदार म्हणजे कर्नाटक विधानसभेतील काँग्रेसचे सर्वात तरुण आमदार प्रियकृष्ण. ३९ वर्षीय आमदाराने ११५६ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. या चालू अहवालात २८ विधानसभा आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ४००१ विद्यमान आमदारांच्या संपत्तीचा आढावा घेतला आहे. 6 / 10त्याचसोबत भारतातील सर्वात गरीब आमदार हे पश्चिम बंगालमधील सिंधू मतदारसंघातील भाजपाचे निर्मल कुमार धारा आहेत, ज्यांच्याकडे १७०० रुपयांची मालमत्ता आहे आणि कोणतेही कर्ज नाही असाही खुलासा ADR रिपोर्टमधून करण्यात आला आहे. 7 / 10आमदार होण्यापूर्वी निर्मल धारा शिकवणी शिकवून आपला उदरनिर्वाह करत होते. २००९ मध्ये, बर्दवान विद्यापीठातून इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर, निर्मलने उदरनिर्वाहासाठी मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे जमीन, घर, वाहन नाही. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कधीही कर्ज घेतले नसल्यामुळे त्यांची कोणतीही देणेदारी नसल्याचे सांगितले.8 / 10दरम्यान, ADR रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील २८४ आमदारांची सरासरी संपत्ती २३.५१ कोटी इतकी असल्याचे म्हटलं आहे. देशातील राज्य विधानसभेतील प्रत्येक आमदार सरासरी १३.६३ कोटींचा मालक असल्याचे अहवालात नमूद आहे. 9 / 10आंध्रप्रदेशातील १७४ आमदारांची सरासरी संपत्ती २८.२४ कोटी आहे. त्रिपुरात ५९ आमदारांची सरासरी संपत्ती १.५४ कोटी ही देशातील सर्वात कमी संपत्ती आहे. त्याचसोबत पश्चिम बंगालमध्ये २९३ आमदारांची सरासरी संपत्ती २.८० कोटी इतकी आहे. 10 / 10अरुणाचलमधील ५९ आमदारांपैकी ४ आमदार अब्जाधीश आहेत. आंध्र प्रदेशात १७४ पैकी १० आमदार अब्जाधीश आहेत. महाराष्ट्र, हिमाचल, गुजरात, मध्य प्रदेश इथं १०० कोटींहून अधिक संपत्ती असलेले अनेक आमदार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications