PM मोदी अन् CM चौहान यांच्यात अंतर का वाढलं? भाजपानं दिलं प्रत्युत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 9:53 PM
1 / 11 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्ली दरबारी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या दौऱ्यात त्यांनी इतरही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. 2 / 11 चौहान यांच्या दिल्ली दौऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवरुन चांगलच राजकारण सुरू आहे. काँग्रेसकडून या भेटीचे फोटो व्हायरल करुन चौहान यांना डिवचण्यात येत आहे. 3 / 11 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांत दोन-तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा केली. यावेळी, मोदींच्या शेजारील खुर्चीत हे मुख्यमंत्री बसलेले होते. 4 / 11 शिवराजसिंह चौहान यांच्यासोबतच्या बैठकीत मोदींजवळील खुर्ची रिकामी दिसत आहे. तर, मोदींसमोर असलेल्या खुर्चीत मुख्यमंत्री बसलेले दिसून येतात. यावरुन, काँग्रेस नेत्यांनी चौहान यांना लक्ष्य केलंय. 5 / 11 चौहान यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात मोदींसह केंद्रीय रसायनमंत्री, रेल्वेमंत्री, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी, ते खुर्चीला खुर्ची टाकून बसले होते. 6 / 11 मोदींसमवेतच्या बैठकीत शिवराजसिंह चौहान लांब बसल्यामुळे ही दरी का वाढलीय, शिवराजसिंह मोदींना आवडत नाहीत का, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी विचारला होता. 7 / 11 काँग्रेसचे प्रवक्ता नरेंद्र सलूजा यांनी मोदींसमवेतचा शिवराजसिंह चौहान यांचा फोटो शेअर करत प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये भाजपा नेतृत्वाबद्दल नाराजी असल्याचं त्यांनी म्हटलं. 8 / 11 आता, या रिकाम्या खुर्चीवर बसण्यासाठी कोणाचा नंबर लागतो, हेच पाहावे लागेल. वीडी शर्मा, नरोत्तम मिश्रा, कैलाश विजयवर्गीय, उमा भारती, प्रह्लाद पटेल किंवा नरेन्द्र तोमर यांना संधी मिळेल, असे ट्विट सलुजा यांनी केलं होतं. 9 / 11 सलुजा यांच्या ट्विटला भाजप नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा मोदींसमवेतचा फोटो शेअर करत, काँग्रेस नेत्यांना संस्कार नसल्याचं म्हटलं आहे. 10 / 11 15 वर्षांचे शालीनता आणि 15 महिन्यांतील गर्व असे लोकेंद्र पाराशर यांनी ट्विट करुन म्हटले आहे. कमलनाथ यांनी मोदीसमोर पाय आडवा केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. 11 / 11 शिवराजसिंह यांच्यासारखे संस्कार काँग्रेस कुठून आणणार?. ज्यांचे प्रमुखच पंतप्रधानांसमोर पाय वरी करुन बसतानाचं दिसून येत आहे, असे भाजपा नेते लोकेंद्र यांनी ट्विटरवरुन म्हटलंय. आणखी वाचा