why rich Indians leave their country read here five reasons
...म्हणूनच श्रीमंत भारतीय आपला देश सोडून जाताहेत? जाणून घ्या पाच कारणे By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:16 AM1 / 10भारतातील अतिश्रीमंत लोक देश सोडून जात असून, प्रामुख्याने संयुक्त अरब आमिरातीला स्थायिक होत आहेत, असे ‘हेन्ले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. 2 / 10२०२३ मध्ये ४,३०० अब्जाधीशांनी भारत सोडून दुबईत आश्रय घेतला असावा, असा अंदाज आहे. 3 / 10अतिश्रीमंत भारतीय लोक देश सोडून का चालले आहेत, याची ५ कारणे समोर आली आहेत. याबाबत जाणून घेऊया.4 / 10१२० अब्ज डॉलर्स परदेशात राहत असलेल्या भारतीयांनी २०२३ मध्ये भारतात पाठविले आहेत.5 / 10६० अब्ज डॉलर्स मेक्सिकोला, चीनला ५० अब्ज डॉलर्स, फिलीपिन्सला ३९ अब्ज डॉलर्स, पाकिस्तानला २७ अब्ज डॉलर्स पाठविण्यात आले आहेत. 6 / 10दुबई मालमत्ता बाजार म्हणून उदयास आले आहे. अतिश्रीमंत भारतीय तिकडे आकर्षित होत आहेत. एकूण विकलेल्या घरांपैकी ४० टक्के घरे भारतीयांनी खरेदी केली आहेत.7 / 10यूएई हा करमुक्त देश आहे. तेथे कोणताही वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. त्यामुळे अतिश्रीमंतांसाठी हा देश स्वर्गच ठरला आहे.8 / 10यूएईने २०२२ मध्ये आपली ‘गोल्डन व्हिसा’ योजना विस्तारित करून व्यावसायिक, कुशल कामगार, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना विशेष लाभासह वास्तव्याची सुविधा दिली आहे.9 / 10दुबईत शिक्षण, आरोग्य, शॉपिंग सुविधा तसेच रस्ते व अन्य नागरी सुविधा अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. उच्चभ्रू वर्गाला त्याची भुरळ पडते.10 / 10यूएईमध्ये तंत्रज्ञान व्यावसायिक आणि स्टार्टअप यांच्यासाठी अत्यंत पूरक धोरणे आहेत. त्यामुळे ही क्षेत्रे तेथे भरभराटीला आली आहेत. त्यामुळे भारतीय तिकडे आकर्षित होत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications