Will BJP form government on its own in 2024?; A big revelation was made in the survey
२०२४ मध्ये भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवणार?; सर्व्हेत झाला मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 10:47 AM1 / 10पुढील होणाऱ्या २०२४ च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलीय. भाजपाविरोधी गटाने इंडिया नावाच्या आघाडीची स्थापना केली असून कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा पराभव करायचा असा चंगच विरोधकांनी बांधला आहे. 2 / 10लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने सर्व्हे केला असून त्याची आकडेवारी आता समोर आली आहे. ज्याआधारे भाजपाच्या जागा कितपत निवडून येतील, जागा जास्त मिळतील की कमी होतील याचा अंदाज बांधला आहे. 3 / 10हे सर्व्हे इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सकडून करण्यात आले आहेत. त्यात INDIA आघाडीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल याबाबत माहिती घेण्यात आली. या सर्व्हेचा निकाल धक्कादायक होता. 4 / 10या सर्व्हेनुसार तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे. जर असे झाले तर नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिनदा पंतप्रधानपदी निवड झालेले पहिले पंतप्रधान ठरतील. नेहरूंच्या रेकॉर्डची ते बरोबरी करतील. 5 / 10सर्व्हेनुसार, भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला जबरदस्त बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. एनडीए आगामी निवडणुकीत ३१८ जागांवर विजयी होऊ शकतो. तर विरोधकांच्या INDIA आघाडीला १७५ आणि इतरांना ५० जागा मिळण्याची शक्यता आहे. 6 / 10मतांची टक्केवारी पाहिली तर INDIA आघाडीला २४.९ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांच्या मतांची टक्केवारी ३२.६ टक्के इतका राहू शकतो. मात्र भाजपाला एकट्याला ४२.५ टक्के मते मिळू शकतात असंही सर्व्हेत म्हटलं आहे. 7 / 10एकट्याच्या बळावर कोणाला किती जागा मिळतील हे पाहिले तर काँग्रेसला ६६ तर भाजपाला एकट्याच्या बळावर २९० जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु हा आकडा पाहिला तर भाजपा आणि एनडीएच्या जागांवर घट होत असल्याचे दिसून येते. 8 / 10२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३५३ जागांवर विजय मिळाला होता. त्यात भाजपाला ३०३ जागांवर यश पटकावले होते. आत्ताचा सर्व्हे पाहिला तर एनडीएला ३५ जागा आणि भाजपाला १३ जागांचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 9 / 10सर्व्हेनुसार, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाला ५२ जागा मिळाल्या होत्या. आताच्या परिस्थितीनुसार काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होऊन अतिरिक्त १४ जागांचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे. 10 / 10पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. INDIA नावाची आघाडी बनवून विरोधकांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. २०२४ मध्ये भाजपा सत्तेतून जाणार असा दावा विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. मात्र भाजपाही एनडीएच्या माध्यमातून विरोधकांशी लढण्यासाठी रणनीती आखत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications