will ghulam nabi azad go with bjp they can get big post know about the astrological predictions
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद भाजपसोबत जाणार? मिळू शकतं मोठं पद! By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 7:50 PM1 / 11काँग्रेसचे बडे नेते गुलाम नबी आझाद पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आता आझाद झाले आहेत. महत्वाचे म्हणजे काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. ते जोवर काँग्रेसमध्ये होते, तोवर त्यांनी स्वतःला पूर्णपणे पक्षासाठी झोकून दिले होते आणि मिळालेल्या जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. 2 / 11आता काँग्रेसमधून आझाद झाल्यानंतर, गुलाम नबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने स्तुती करताना दिसत आहेत. गुलाम नबी यांनी राजकीय कारकिर्द 1973 साली सुरू झाली. ते 1980 मद्धे लोकसभेवर निडून गेले. नंतरच्या काळात ते कँबिनेट मंत्रीही झाले. एवढेच नाही, तर ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही झाले होते. त्यांना नुकताच पद्मभूषण सन्मानही देण्यात आला आहे. 3 / 11गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, आता जम्मूमध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. खरे तर गुलाम नबी यांनी अचानकपणे काँग्रेसचा राजीनामा का दिला? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. गुलाम नबी भाजपसोबत जाणार, की नशीब त्यांना आणखी कुठे घेऊन जाणार? नेमकं काय सांगतं ज्योतीष, जाणून घेऊयात... 4 / 11गुलाम नबी यांचा जन्म 7 मार्च 1949 रोजी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी झाला. ज्योतिष शास्त्रानुसार, यांची कुंडली तुळ लग्नाची असून त्यांच्या लग्नात केतु आणि सप्तम स्थानी राहु विराजमान आहे. याशिवाय, सूर्य आणि मंगळ धनेश आणि लाभेश होऊन पंचमात स्थित आहेत. यांच्या कुंडलीत शनी योगकारक असून लाभ स्थानात आहे. जो त्यांना चाणक्याप्रमाणे मुत्सद्दी बनवतो.5 / 11ज्योतिष नियमांनुसार, बलवान शनी जेव्हा सूर्यासोबत असतो अथवा त्याची दृष्टी असते, तेव्हा तो संबंधित व्यक्तीला अत्यंत वर घेऊन जातो. विशेषतः तो त्या व्यक्तीला राजकारणाच्या क्षेत्राकडे घेऊन जातो. असाच संयोग गुलाम नबी आझाद यांच्या कुंडलीतही आहे. जेव्हा शनी त्यांच्या भाग्य स्थानी होता, तेव्हा ते राजकारणात आले आणि जेव्हा राहू सत्ता स्थानी अथवा दशम स्थानी कर्क राशीत आला तेव्हा ते कॅबिनेट मंत्री झाले.6 / 11गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्याचं ज्योतिष कनेक्शन - सध्या गुलाम नबी यांचा योगकारक शनी ऑक्टोबरपर्यंत वक्री आहे. जेव्हा योगकारक ग्रह वक्री असतो, तेव्हा तो भविष्य काळासाठी परिवर्तनासाठी पुढील दरवाजे उघडत असतो. खरे तर, शनीकडे एक दीर्घ दृष्टी आहे. एक व्हिजन आहे. ते फार पुढचा विचार करतात. शनीनेच त्यांना राजीनामा देण्यासाठी प्रेरित केले आहे.7 / 11सध्या राहू मेष राशीमध्ये आहे. गुलाम नबी यांच्या कुंडलीतही राहू मेष राशीमध्येच आहे. यामुळे आता राहू देखील अॅक्टिव्ह झाला आहे. राजकारणात नवे मार्ग शोधण्यासाठी राहू त्यांना मदत करत आहे. मंगळ सध्या अष्टम स्थानात आहे. त्याची दृष्टी शनीवर आहे. यामुळे अष्टमात येताच त्यांनी शनीला जागृत केले आणि गुलामनबींनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.8 / 11काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहरलाल शर्मा यांच्यासह काँग्रेसचे 51 मोठे नेते लवकरच राजीनाम्याची घोषणा करणार आहेत, असे समजते.9 / 11गुलाम नबी भाजपसोबत जाणार? - गुलाम नबी आझात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे ते भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य जनतेस सुरू आहे. कुंडलीच्या नजरेतून बघायचे झाल्यास, पंतप्रधान मोदी आणि गुलाम नबी यांच्या कुंडलीत चांगला ताळमेळ आहे. कारण, मोदीचा आणि गुलाम नबी आझाद, या दोघांचाही शनी सिंह राशीतच आहे.10 / 1117 जानेवारी 2023 पर्यंत शनी मकर राशीत आहे. यामुळे त्यांची भाजपसोबत थेट युती होणार नाही. मात्र, शनी त्यांच्या जन्माच्या सूर्याच्या वर येताच आणि जन्माच्या शनीवर त्याची दृष्टी पडताच अर्थात फेब्रुवारी 2023 पासून ते केव्हाही भाजप सोबत जोडले जाऊ शकतात.11 / 11कुंडलीतील गणनेचा विचार करता, पुढील काळ गुलाम नबींसाठी उन्नती करणारा आहे. नशीब त्यांना देशाच्या एखाद्या मोठ्या पदावरही घेऊन जाऊ शकते. (टीप - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यातील कुठल्याही दाव्याची पुष्टी करण्यात आलेली नाही.) आणखी वाचा Subscribe to Notifications