शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली महिला, डॉक्टरांनी नसबंदी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:04 PM

1 / 7
रांचीमध्ये एका महिलेने एका रुग्णालयाच्या डॉक्टरांवर खळबळजनक आरोप केला आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी न विचारता तिची नसबंदी केली.
2 / 7
रांचीच्या सदर रुग्णालयात कांता टोली येथे राहणारी पूनम देवी यांना प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला सिझेरियन ऑपरेशनची आवश्यकता असल्याचे सांगितले.
3 / 7
दरम्यान, ऑपरेशनदरम्यान पूनम देवी यांच्या संमतीशिवाय तिची नसबंदी करण्यात आली, असा आरोप केला जात आहे. या महिलेच्या आरोपानंतर आता याप्रकरणी आरोग्य विभाग तपास करत असल्याचा दावा करत आहे.
4 / 7
तर, दुसरीकडे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या महिलेचा आरोप पूर्णपणे फेटाळला आहे. रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. सव्यसाची मंडल यांनी सांगितले की, नसबंदीच्या ऑपरेशनसाठी फक्त महिलेची संमती आवश्यक आहे. त्या महिलेने संमती दिली, त्यानंतरच तिची नसबंदी करण्यात आली आहे.
5 / 7
पीडित पूनम देवी म्हणाल्या, प्रसुतीनंतर असे सांगण्यात आले की, नसबंदीही झाली आहे. तसेच, या पीडित महिलेचा असा आरोप आहे की तिच्या किंवा तिच्या पतीच्या संमतीशिवाय डॉक्टरने सिझेरियन प्रसुतिदरम्यान नसबंदी देखील केली.
6 / 7
सिव्हिल सर्जनला जेव्हा या महिलेने केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, महिलेच्या संमतीशिवाय ऑपरेशन करता येणार नाही. आता जेव्हा महिला या प्रकरणाची तक्रार करीत असेल तेव्हा तिची चौकशी करण्यात येईल.
7 / 7
याचबरोबर, या महिलेने सांगितले की डॉक्टरांनी नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पती किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची संमती घेतली नाही. आपली चूक लपवून ठेवता यावी, यासाठी डॉक्टरांनी कागदपत्रांवर बनावटपणे सही करून नसबंदीचे ऑपरेशन केले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर