world health organization said corona mini panademic in india
भारतात मिनी कोरोना लाटेची दाट शक्यता!, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचं मोठं विधान; वेगानं पसरतोय विषाणू By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 1:23 PM1 / 9जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात काही ठिकाणी कोरोनाच्या ओमायक्रॉन सबव्हेरिअंट BA.4 आणि BA.5 वेगानं पसरत आहे. 2 / 9डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देशात सध्या मिनी कोरोना लाटेची सुरुवात ठरू शकते. देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.3 / 9देशात गुरुवारी ७ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जे सब व्हेरिअंट दिसून येत आहेत ते मूळ ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या तुलनेत अधिक वेगानं पसरणारे व्हेरिअंट आहेत.4 / 9डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की असंही होऊ शकतं की दर चार आणि सहा महिन्यांच्या अंतराने मिनी कोरोना लाट पाहायला मिळू शकते. कारण सध्या ज्यापद्धतीनं रुग्णवाढ दिसत आहे असंच म्हणता येऊ शकतं. 5 / 9कोरोना प्रोटोकॉलचं पालन करणं तर महत्वाचं आहेच पण आता जे सब व्हेरिअंट पसरत आहेत त्यांना ट्रॅक करणं देखील खूप महत्वाचं आहे असंही त्या म्हणाल्या. कोरोनाची चाचणी आता घरबसल्या करता येते इतकी सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीवर पूर्वीपेक्षा नियंत्रण मिळवता येईल असं स्वामीनाथन म्हणाल्या. 6 / 9रुग्णालयात सध्या दाखल असलेल्या रुग्णांवर लक्ष देण्याची गरज आहे. तसंच अधिक धोका असलेल्या ६० वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देणं गरजेचं आहे. कोरोनाच्या BA.4 आणि BA.5 व्हेरिअंटमुळे द.आफ्रिकेत पाचवी लाट आल्याचाही उल्लेख त्यांनी केला. 7 / 9देशात सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत ते कोरोना विषाणूच्या सबव्हेरिअंटचे रुग्ण आहेत हे तर स्पष्टच आहे. ज्यात याआधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनाही पुन्हा बाधा होण्याची क्षमता या व्हेरिअंटमध्ये आहे, असं सुप्रसिद्ध वायरोलॉजिस्ट आणि ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजच्या अध्यापकांनी सांगितलं. 8 / 9लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं असल्यामुळे नव्या व्हेरिअंटमुळे गंभीर स्वरुपाची प्रकरणं निर्माण होणार नाहीत असाही दावा त्यांनी केला. 9 / 9ज्या व्यक्ती सर्वाधिक जोखमीच्या वर्गवारीत आहेत आणि त्यांनी कोरोना विरोधी लस घेतलेली नाही अशाच व्यक्तींना नव्या व्हेरिअंटचा गंभीर त्रास होऊ शकते, असंही ते म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications