शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘जागतिक वारसा’ लाभलेली भारतातील काही नयनरम्य स्थळे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 5:45 PM

1 / 11
ज्या स्थळांना भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा व महत्व लाभलं आहे अशी स्थळे जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जातात. युनेस्कोने अशा स्थळांची यादी तयार करून त्या स्थळांच्या संवर्धनाची व संरक्षणाची जबाबदारी घेतली. आज ‘जागतिक वारसा दिना’निमित्त भारतातील अशीच काही जागतिक वारसा लाभलेली स्थळे आपण पाहणार आहोत.
2 / 11
१) काझीरंगा (आसाम) – युनेस्कोने १९८५ साली काझीरंगा अभयारण्याला अद्वितीय नैसर्गिक पर्यावरणाचा दर्जा दिला आहे. या ४२,९९६ हेक्टर्सच्या भागात नैसर्गिक पर्यावरणासोबतच दुर्मिळ प्रजातींचे प्राणीही इथे पाहायला मिळतात.
3 / 11
२) महाबोधी मंदिर ( बिहार) – बिहारमधील या प्रसिद्ध मंदिराला युनेस्कोने सर्वात महत्वाची सांस्कृतिक व पुरातन वास्तू म्हणून संबोधलं आहे. सम्राट अशोकाच्या काळात बांधलेल्या या वास्तूमुळे भारतीय वास्तूशैलीची नव्याने ओळख निर्माण झाली.
4 / 11
३) गोव्यातील चर्च – १६ ते १८ व्या शतकादरम्यान गोव्यात पोर्तुगीजांनी बांधलेल्या अशा अद्वितीय वास्तूंना जागतिक महत्व आहे. १९८६ साली युनेस्कोने गोव्यातील सर्व चर्चला जागतिक वारसा स्थळ म्हणून संबोधलं.
5 / 11
४) हंपी (कर्नाटक) – कर्नाटकमधील तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेल्या हंपी येथील स्मारकांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. हंपी हे हिंदू आणि जैन धर्मियांसाठी महत्वाचं ठिकाण मानलं जातं
6 / 11
५) अजंठा वेरूळ लेणी (महाराष्ट्र) – महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आवडीचं व युनेस्कोच्या यादीत जागतिक सांस्कृतिक श्रेत्र म्हणून ओळख असलेलं ठिकाण म्हणजे अजिंठा-वेरूळ लेणी. बौद्ध संस्कृतीच्या छटा असलेल्या या ठिकाणाला जागतिक वारसा लाभलेला आहे.
7 / 11
६) छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) – मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे सर्वात जुनं व ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे. १८८७ साली बांधण्यात आलेलं हे स्टेशन जागतिक वारसा लाभलेल्या ठिकाणांमध्ये सर्वात प्रचलित आहे.
8 / 11
७) भीमबेटका (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील भीमबेटका येथे नैसर्गिक दगडी गुहा असून त्यावर पुरातन काळात केलेली चित्रकला दिसून येते. म्हणून युनेस्कोनं या ठिकाणांना अद्भूत सांस्कृतिक वास्तूचा दर्जा दिला.
9 / 11
८) दार्जिलिंग हिमालय रेल्वे (पश्चिम बंगाल) – दार्जिलिंग हिमालय रेल्वे, निलगिरी पर्वत रेल्वे आणि कलका शिमला रेल्वे या रेल्वेंना युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळाचा वारसा लाभला आहे.
10 / 11
९) पश्चिमी घाट – पश्चिमी घाटात सर्वात जास्त जैवविविधता आहे. या पर्वतांमध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागाचा समावेश होतो.
11 / 11
१०) ताज महाल (उत्तर प्रदेश) – जगातील ७ आश्चर्यांमध्ये ताजमहालचा समावेश होतो. शाहजाहनने त्यांची पत्नी मुमताजसाठी १६३१ साली हि वास्तू बांधली होती. ऐतिहासिक वास्तू व दुर्मिळ मुघल बांधकामामुळे युनेस्कोने ताजमहालचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केलाय.
टॅग्स :Travelप्रवासMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र