वाह ताज! लवकरच पर्यटकांच्या संख्येवर येणार मर्यादा By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 4:32 PM
1 / 5 जगप्रसिद्ध ताज महाल परिसरात रोज फक्त ४0 हजार पर्यटकांना प्रवेश द्यायचा विचार पुरातत्व विभाग (एएसआय) करीत आहे. 2 / 5 पर्यटन हंगामात व अनेकदा ताज महालला भेट देणा-यांची संख्या ६० ते ७० हजाराच्या घरात असते. 3 / 5 पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे ताज महालच्या पायाला इजा पोहोचू शकते, असे एएसआयच्या अधिका-याने सांगितले. 4 / 5 ताज महालच्या भुयारी खोलीत प्रवेशासाठी तिकीट आकारणे आणि १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेशाचाही विचार सुरू आहे. 5 / 5 जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालबद्दल फक्त देशीच नव्हे परदेशी पर्यटकांनाही मोठे आकर्षण आहे. आणखी वाचा