This year, LIC's IPO will launch; other companies also entry into the share market
यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 2:23 PM1 / 12कोरोनामुळे जवळपास 4 महिने थंड बस्त्यात असलेला आयपीओ पुन्हा सुरु होणार आहे. रोझरी बायोटेकच्या आयपीओने या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. जुलैमध्ये या कंपनीने बीएसईवर सुरुवात केली आहे. पुढील सहा महिन्यांत जवळपास डझनावर आयपीओ येणार आहेत. यामध्ये एलआयसी देखिल असणार आहे. कोरोना काळात बंपर कमाई करण्याची ही सुवर्णसंधी आहे. 2 / 12Monte Carlo ही अहमदाबादची कंपनी आहे. ही कंपनी आयपीओतून 550 कोटी रुपये गोळा करणार आहे. कंपनी या पैशांचा वापर नवीन प्रकल्प, कामासाठी करणार आहे. 3 / 12NCDEX नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज लिमिटेड 500 कोटींचा आयपीओ आणणार आहे. एप्रिल महिन्यातच मंजुरी मिळाली आहे. 4 / 12Equitas ही भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँक (SFB) पैकी एक आहे. कंपनीने 1000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी गेल्या वर्षी अर्ज केला होता. य़ास सेबीने मार्चमध्ये मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे मार्चमध्ये आयपीओ लाँच रद्द करण्यात आला होता. 5 / 12बर्गर किंग (Burger King) इंडियाने नोव्हेंबर 2019 मध्ये अर्ज केला होता. जानेवारीत याला मंजुरी मिळाली आहे. ही कंपनी आपीओद्वारे 1000 रुपये गोळा करणार आहे. 6 / 12EaseMyTrip ही ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी आयपीओ आणणआर आहे. याद्वारे 510 कोटी रुपये गोळा करण्यात येणार आहेत. 7 / 12महत्वाचे म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज NSE जे भारताचे सर्वात मोठे स्टॉक एक्स्चेंज आहे त्याचा देखील आयपीओ येणार आहे, सेबीची चौकशी मागे लागल्याने काही वर्षांपासून आयपीओ आणता येत नव्हता. तो आता डिसेंबरच्या आधीच आणला जाणार आहे. 8 / 12लोढा डेव्हलपर्स देखील तब्बल 5500 कोटी रुपये गोळा करण्यासाठी जुलै 2018 मध्ये आयपीओ आणणार होती. मात्र आता कंपनीचा 3300 कोटी रुपये गोळा करण्याचा विचार आहे. 9 / 12बजाज एनर्जीला (Bajaj Energy) गेल्या वर्षी सप्टेंबर 5450 कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी मिळाली होती. आयपीओद्वारे गोळा केलेली रक्कम कंपनी ललिपूर पावर जनरेशन आणि बजाज हिंदुस्तान शुगरला खरेदी करण्यासाठी वापरली जाणार आहे. 10 / 12बॉर्बेक्यू नेशन (Barbeque Nation) ही डायनिंग रेस्टॉरंट क्षेत्रातील कंपनी आयपीओ आणणार आहे. याद्वारे कंपनी 1000 कोटी रुपये जोडणार आहे. 11 / 12यंदा सर्वाधिक चर्चेचा आणि बहुप्रतिक्षित आयपीओ भारतीय जीवन विमा निगम (LIC) चा असणार आहे. आयआरसीटीसीनंतर गुंतवणूकदारांच्या उड्या एलआयसीवर पडणार आहेत. 12 / 12शेअर बाजारात आल्यानंतर ही एलआयसी दिग्गज कंपन्यांच्या यादीत जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने एलआयसीचा एक भाग विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यामुळे एलआयसीचे बाजारमुल्य 8 ते 10 लाख कोटी होणार आहे. हा आयपीओही यंदा लाँच होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications