शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मी लसीकरणाचा विरोधक नाही, पण योग, प्राणायम केल्यानं इम्युनिटी वाढते : बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 8:45 AM

1 / 14
मागील म्हणजे २०२० हे वर्ष कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात संपूर्ण जगासाठीच वाईट ठरलं. या महासाथीनं संपूर्ण जगाचा वेगच मंदावला.
2 / 14
या वर्षी आपण यातून बाहेर पडू अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे.
3 / 14
बुधवारी जगभरात आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. या निमित्तानं योगगुरू बाबा रामदेव यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला.
4 / 14
'सध्या कोरोना लसीकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत जिकडे डॉक्टरांनी लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली. ज्यांना एकदा कोरोना झाला होता त्यांना सहा महिन्यात पुन्हा झाला,' असं बाबा रामदेव म्हणाले.
5 / 14
'लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर ती रोग प्रतिकारक क्षमता संपते. अशात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क व्यतिरिक्त आपली इम्युनिटी वाढवणं आवश्यक आहे,' असं बाबा रामदेव म्हणाले.
6 / 14
यासाठी गिलोय आणि तुळशीचं सेवनं करावं आणि अनुलोम-विलोम करानं योग करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
7 / 14
आपण कोरोना लसीकरणाच्या विरोधात नाही, असंही बाबा रामदेव यांनी यावेळी स्पष्ट केलं.
8 / 14
लसीकरणानंतर शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात. जर त्यांनी योग केला तर ३० ते ५० टक्के अधिक अँटीबॉडीज वाढतात. यासाठी लसीकरणासोबतच योग करणंही आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
9 / 14
कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांचा मृत्यू होत नाही. तर बीपी, रेस्परेटरी आणि हृदयासारख्या गंभीर समस्यांमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावा त्यांनी केला.
10 / 14
कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर नियमित कराच पण त्यासोबत योग आणि आयुर्वेदाचा डबल डोसही नक्की घ्यावा, असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.
11 / 14
कोरोनामुळे अनेकदा पचनाच्या समस्या निर्माण असतात. अशासाठी ज्या पचनासाठी चांगल्या असतील अशाच पदार्थांचं सेवन करावं असा सल्ला त्यांनी दिला.
12 / 14
लोकांची कच्चा कांदा खावा, त्यानं चांगली झोप येईल. सर्वांनी साधं जेवण घ्यावं आणि जंक फूट पासून वाचावं असा सल्लाही त्यांनी दिला.
13 / 14
सुरूवातीला लोकांनी आपल्या खाण्यापिण्याची सवय ठीक केली होती. परंतु आता लोकांना कसलीही भीती वाटत नाहीये. त्यांचा दिनक्रम बिघडत चालला आहे असं बाबा रामदेव म्हणाले.
14 / 14
अशा परिस्थितीत लोकांनी स्वत: विचार केला पाहिजे की आपल्यासाठी आपण स्वत: जबाबदार आहोत. यासाठी स्वत:ला कमकूवत होऊ द्यायचं नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBaba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली