You will be amazed to see India's largest bird idol in the world!
भारतात जगातल्या सर्वात मोठ्या पक्ष्याची मूर्ती, पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:28 PM1 / 6रावणानं जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं, त्यावेळी तिला वाचवण्यासाठी जटायूनं प्राणांचं बलिदान दिलं होतं. 2 / 6असं म्हणतात, युद्धात पराभव झाल्यानंतर जटायूचे पंख रावणानं बांधले होते, त्यावेळी तो चादामंगलमच्या खोऱ्यात कोसळला होता. 3 / 6केरळमधल्या त्याच ठिकाणी चादामंगलम असं एक पार्क आणि पर्यटन केंद्र आहे. हे पर्यटनस्थळी समुद्र सपाटीपासून 350 मीटर(1200 फूट) उंचावर स्थित आहे. 4 / 6त्याच ठिकाणी जटायूची सर्वात भव्य मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. जटायूची पक्ष्याची ही भव्य मूर्ती (200 फूट लांब, 150 फूट रुंद, 70 फूट उंच) पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 5 / 6रावणाबरोबर झालेल्या युद्धात जटायूनं एका गुहेत आश्रय घेतला होता. एका गुहेचं एका रिसॉर्टमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. 6 / 6अनेक पर्यटकांसह रुग्णांना जटायूच्या कहाणीबरोबर आयुर्वेदिक उपचारही मिळणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications