You will feel proud of reading this story of Lal Bahadur Shastri's simplicity
लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे हे किस्से वाचून तुम्हाला वाटेल अभिमान By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 3:39 PM1 / 5देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती. लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या साधेपणा आणि शिष्टाचाराने भारतीय राजकारणात एक आदर्श निर्माण केला. जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील काही घटनांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप. 2 / 5शाळेत शिकत असताना शास्त्री यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे नदीमध्ये पोहत ते शाळेत जात. 3 / 5आजकालच्या सामान्य नेत्याकडेही वाहनांचा ताफा असतो. मात्र शास्त्रीजी सरकारी कारचासुद्धा वापर करत नसत. एकदा त्यांच्या मुलाने सरकारी कार वापरली. त्यामुळे दु:खी झालेल्या शास्त्रीजींनी किलोमीटरच्या हिशोबाने कारचे भाडे सरकारी तिजोरीत जमा केले.4 / 5आर्थिक परिस्थितीमुळे पत्नीसाठी महागडी साडी घेणे त्यांना शक्य झाले नाही. त्यावेळी मिलच्या मालकाने साडी भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शास्त्रीजींनी ही भेट नाकारली.5 / 5जय जवान जय किसानचा अजरामर नारा लालबहादूर शास्त्री यांनीच दिला होता. त्यावेळी देशात अन्नधान्याची टंचाई होती. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस उपवास करण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. तसेच स्वत:ही कुटुंबीयांसमवेत उपवासाचे व्रत पाळले. आणखी वाचा Subscribe to Notifications