zomato took the side of the delivery boy in the Bengaluru case know what says zomato
२ वर्षांत ५ हजारांहून अधिक डिलिव्हरी, उत्कृष्ट रेटिंग; Zomato ने घेतली 'त्या'चीच बाजू By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 3:31 PM1 / 11Zomato मागविलेले जेवण उशिराने आल्याने एका मॉडेलने (Model hitesha chandranee) ते रद्द केले म्हणून चिडून डिलिव्हरी बॉयने (Zomato Delivery boy hit on nose) तिच्या नाकावर बुक्का मारल्याची घटना घडली होती. अटक केलेल्या झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजने पोलिसांना चौकशीमध्ये वेगळेच सांगितल्याचे समोर आले आहे. 2 / 11कामराज असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या प्रकरणाच्या संदर्भातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. मात्र, याला आता वेगळेच वळण लागल्याचे समोर आले आहे. 3 / 11झोमॅटो आणि मॉडेलमधील वाद वाढल्यानंतर आता कंपनीकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. झॉमेटो कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी म्हणणे मांडले आहे. झोमॅटो कंपनीकडून हितेशा हीचा वैद्यकीय खर्च उचलला जात आहे. 4 / 11हितेशासह कंपनी कामराज याच्याशी सुद्धा संपर्कात आहे. नियमानुसार, कामराज याला निलंबित करण्यात आला आहे, असे दीपेंद्र गोयल यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर कामराज याचा न्यायालयीन खर्चही उचलला जात आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे. 5 / 11कामराजने गेल्या २६ महिन्यांत ५ हजारांहून अधिक ठिकाणी पार्सल डिलिव्हरी केली आहे. झोमॅटो कंपनीत कामराजला ४.५७ असे उत्कृष्ट रेंटिंग ग्राहकांकडून देण्यात आले आहे. या प्रकरणात नेमके काय घडले, सत्य काय आहे, याचा शोध झोमॅटो घेणार आहे, असेही दीपेंद्र गोयल यांनी नमूद केले आहे.6 / 11पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. मी त्यांची त्यासाठी माफी मागितली. रस्ता खराब आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असे कामराजने त्यांना सांगितले. 7 / 11मॉडेल असलेल्या हितेशा चंद्राणीला कामराजने बुक्का मारला नाही, उलट कामराज येताच हितेशानेच त्याच्यावर हल्ला केला, असे आता कामराजने पोलिसांना सांगितल्याचे समजते. हितेशाने जेवण ताब्यात घेतले परंतू तिने पैसे देण्यास नकार दिला. ती म्हणाली की ती झोमॅटो कस्टमर सपोर्टशी बोलत आहे.8 / 11हितेशाने यानंतर त्याला अश्लिल शिव्या दिल्या व जोरजोरात ओरडायला लागली. तर झोमॅटो सपोर्टने कामराजला ऑर्डर कॅन्सल केल्याचे सांगितले. यामुळे कामराजने तिला जेवण परत करण्यास सांगितले. जेव्हा तिने ते मागे देण्यास नकार दिला तेव्हा तिथून कामराज निघून जात होता.9 / 11यानंतरही ती त्याला शिव्या देत होती. अचानक तिने त्याच्यावर चप्पल उगारली आणि मारायला सुरुवात केली. मी तिला रोखण्यासाठी हात पुढे केला. यावेळी तिचाच हात चुकून तिच्याच नाकावर लागला. मी फक्त तिचा वार रोखण्यासाठी हात पुढे केला होता. तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकावर लागली. तिचा व्हिडीओ पाहिल्यास त्यामध्ये स्पष्ट दिसेल असेही कामराजने पोलिसांना सांगितले. 10 / 11तिच्या नाकावर जखम झाली ती अंगठीमुळे झालीय, ठोसा लगावल्यामुळे नाही, असे कामराज म्हणाला. दरम्यान, ऑर्डर केलेलं जेवण तरूणीपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड डिलिव्हरी बॉयला उशीर झाला. यानंतर त्या तरूणीनं ती ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतरही थोड्या वेळानं तो डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या तरूणीच्या घरी पोहोचला. 11 / 11परंतु तरूणीनं ते जेवण घेण्यास नकार दिला तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयला राग अनावर झाला आणि त्यानं त्या तरूणीच्या नाकावर बुक्का मारला. त्यानंतर तिच्या नाकातून रक्तही वाहू लागल्याचा दावा तरूणीनं केला आहे. त्यानंतर तिनं याचा व्हिडीओ बनवून लोकांना याबाबत माहिती दिली. हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications