शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सन्मान धाडसाचा... मयूर शेळकेच्या दारात उभी राहिली जावा कंपनीची 'नवी कोरी बाईक'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 5:07 PM

1 / 14
नवी मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकावरील पॉइंटमनने प्रसंगावधानता दाखवत एका अंधमातेच्या चिमुकल्‍याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.
2 / 14
मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. पॉइंटमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. मयूर शेळकेंच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
3 / 14
गल्लीपासून दिल्लीपर्यंत मयूर यांच्या बहादूर कामगिरीला सॅल्यूट करण्यात येत आहे. आता, शौर्यमॅन मयूर शेळकेंवर अभिनंदनासह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे.
4 / 14
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 हजार रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलंय.
5 / 14
रेल्वेकडून मयूर यांना ५० हजारांचं बक्षीस देण्यात आलं. यातील निम्मी रक्कम मयूर त्यांनी वाचवलेल्या मुलाच्या आईला देणार आहेत.
6 / 14
मयूर यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक झालं. रेल्वेकडून त्यांना ५० हजारांचं बक्षीस मिळालं. यातील २५ हजार रुपये मयूर शेळके संगीता शिरसाट यांना देणार आहेत.
7 / 14
'मला बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतील निम्मी रक्कम संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय मी घेतला आहे.
8 / 14
शिरसाट यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याचं मला समजलं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. ही रक्कम संगीता यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगी ठरेल,' असं शेळके यांनी सांगितलं.
9 / 14
मयूर यांच्या धाडसाचं दर्शन पाच दिवसांपूर्वी घडलं. आता त्यांनी त्यांच्यातल्या दातृत्त्वाचं दर्शन घडवत पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.
10 / 14
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देणार असल्याचं म्हटलं होतं
11 / 14
जावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मयूर शेळके यांच्या घर जाऊन त्यांना जावा कंपनीची नवी कोरी बाईक भेट दिली.
12 / 14
सोशल मीडियावर सध्या नव्या बाईकसह मयूर शेळकेंचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत अनेकजण सुपरहिरो... ब्राव्हो... असे कॅप्शन देत मयूरच्या धाडसाचं कौतुक होत आहे.
13 / 14
जावा कंपनीचे अनुपम थरेजा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंच्या धाडसांचं कौतुक केलंय. तसेच, या कामगिरीबद्दल त्यांना जावा परिवाराकडून बाईक देण्याचं जाहीर केलं होतं.
14 / 14
जावा कंपनीचे कर्मचारीह कार्यालयाबाहेर एकत्र जमले असून त्यांनी एकदिलाने एकमुखाने मयूर शेळकेंच्या कार्याला सॅल्यूट केलाय
टॅग्स :railwayरेल्वेbikeबाईकTwitterट्विटरViral Photosव्हायरल फोटोज्