शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 1:08 PM

1 / 8
सिडको आणि महायुती सरकारसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर पहिलं विमान उतरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख अधिकारी या धावपट्टी चाचणीवेळी उपस्थित होते.
2 / 8
२०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कामाला वेग आला असून, पूर्ण झालेल्या पहिल्या धावपट्टीवर भारतीय वायू दलाचे सी-२९५ हे विमान उतरवण्यात आले.
3 / 8
धावपट्टीवर उतरण्यापूर्वी सी-२९५ विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर विमान यशस्वीपणे नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आले. विमान यशस्वीपणे उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट करण्यात आला.
4 / 8
सी-२९५ विमानाबरोबरचं सुखोई ३० नेही विमानतळावर आधी घिरट्या मारल्या आणि नंतर विमानतळावर लँडिंग करण्यात आले. आजूबाजूला हिरवाई असल्याने विमान लँडिंग होतानाचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असेच होते.
5 / 8
हवाई दलाचे सी-२९५ विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानात जाऊन वैमानिकांचे अभिनंदन केले. तसेच धावपट्टीची पाहणी केली.
6 / 8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सिडकोच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. या विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहेत. विमातळावर चार टर्मिनल असणार आहेत.
7 / 8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाचवेळी ३५० विमाने उभी केली जाऊ शकणार आहेत. या विमानतळापर्यंत जाण्यासाठी मेट्रो असणार आहे.
8 / 8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर हवेत घिरट्या मारताना सुखोई-३० विमान..
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीairforceहवाईदल