शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचा मूलांक कोणता? अंकज्योतिषानुसार तुमचे वार्षिक फळ जाणून घ्या.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 27, 2021 5:04 PM

1 / 9
अंकज्योतिषानुसार १ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष साधारण असणार आहे. तसे असले, तरी वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कामावर दिसू येईल. परिणामी नोकरीत बढती आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे ठळकपणे दिसत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष प्रगतीचे आहे. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल, तर खूप मेहनत घ्या. त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांनी थोडी जपून पावले टाकावित. वर्षाची सुरुवात साधारण झाली, तरीही कुठेही गुंतवणूक करताना घाई गडबड करून नका. श्रद्धा आणि सबुरी राखलित तर भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. वर्षाच्या मधल्या काळात प्रगती दिसू लागेल आणि वर्षाच्या शेवटी व्यवसायात वाढ झालेली दिसून येईल. १ मूलांक असलेल्यांनी आपल्या जोडीदाराशीदेखील थोडे सबुरीने घ्यावे. नात्यात थोड्या फार कुरबुरी होतील, परंतु नात्यात पारदर्शकता ठेवलीत, तर ऋणानुबंध दृढ होतील.
2 / 9
अंकज्योतिषानुसार २ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. या वर्षभरात तुम्हाला कष्टाचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना यशाचे शिखर खुणावेल. तुमचे प्रयत्न तुमचे इतरांपेक्षा असणारे वेगळेपण सिद्ध करतील. या वर्षात प्रेमवीरांचे प्रेमसंबंध दृढ होतील. लग्नाचा विचार करत असाल, तर त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. नोकरीत बदली अपेक्षित असल्यास मिळू शकेल. काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या प्रयत्नात असाल, तर त्यातही यश मिळू शकेल. मूलांक २ असणाऱ्या लोकांचे दांपत्यजीवन सुखात व्यतीत होईल. तीर्थयात्रा होतील. कुटुंबासाठी वेळ दिलात, तर कौटुंबिक जीवन आनंदात व्यतीत होईल.
3 / 9
अंकज्योतिषानुसार ३ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष सामान्य असणार आहे. या वर्षात आपण नवीन कला तसेच नवीन क्षेत्रात स्वत:ला आजमावून पाहू शकाल. परंतु, त्यातही अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यामुळे आत्मशांती लाभेल. नोकरदारांना वर्षभरात अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागेल. परंतु वर्षाच्या उत्तरार्धात मेहनतीचे फळही मिळेल. वर्षभरात आर्थिक स्थिती बेताची राहील. त्यामुळे खर्च जपून करा. तसेच शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही सांभाळा.
4 / 9
अंकज्योतिषानुसार ४ मूलांक असलेल्या लोकांसाठी हे वर्ष संमिश्र परिणाम देणारे ठरेल. या लोकांनी पूर्ण वर्षभरात चतुराईने नाही, तर प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्यायचा आहे. त्यावरच त्यांचा विकास अवलंबून आहे. तुमच्या अन्य इच्छाही पूर्ण होतील. त्यामुळे तुमचे वर्ष आनंदात जाईल. प्रेमी युगुलांसाठी हे वर्ष आनंदाचे आणि समाधानाचे जाईल. कुरबुरी होतील, पण त्याचा परिणाम नात्यावर होणार नाही. आपण समाजकार्यात सहभाग घ्याल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष साधारण असेल. सरकारी कर्मचाऱ्यांना हे वर्ष अधिक फलदायी असणार आहे. व्यावसायिकांना देखील व्यवसायात नवनवीन संधी मिळणार आहेत.त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. त्यामुळे मान-सन्मान मिळेल. लोकप्रियता मिळेल. विवाहितांचे वैवाहिक आयुष्य साधारण असेल, परंतु वर्षाचा शेवटचा काळ नात्यात एकमेकांना सांभाळून घ्यावे लागेल.
5 / 9
सुरुवातीलाच म्हटल्यानुसार ५ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष सर्वात जास्त लाभदायक आहे. त्यांनी हर क्षेत्रात शक्य तेवढा लाभ करून घेतला पाहिजे. या वर्षात उत्तम आरोग्याबरोबर उत्तम ग्रहस्थिती असणार आहे. तसेच किरकोळ अडचणींवरदेखील मात करू शकाल. कुटुंबात काही कारणाने मतभेद होतील. नोकरी व्यवसायानिमित्तकौटुंबिक सदस्यांचा काही काळ विरहदेखील सहन करावा लागेल. कुटुंबात निर्माण झालेले प्रश्न परस्पर सामंजस्याने सोडवणे उचित ठरेल. या वर्षात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. पैसे जपून वापरा. अनावश्यक खर्च टाळा़ नोकरी व्यवसायात प्रगती झाल्यावर आलेल्या उत्पन्नाचा योग्य विनिमय करा. तसेच शक्य झाल्यास धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग घ्या.
6 / 9
अंकज्योतिषानुसार मूलांक ६ असणाऱ्या लोकांनाही हे वर्ष फायद्याचे ठरणार आहे. आपले वैवाहिक आयुष्य आनंदात जाणार आहे. तीर्थक्षेत्री जाण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे गांभीर्य ओळखून लक्ष वेंâद्रित केल्यास भविष्यात घवघवीत यश संपादन करू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. ते तुमचे मन जपण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुमच्या मनात त्यांच्याप्रती स्नेह व प्रेम उत्पन्न होईल. वर्षाच्या मध्यांतरात नोकरी बदलण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे आर्थिक आवक वाढेल. वर्ष समाधानाचे राहील. तसेच वैवाहिक जीवन आनंदाचे राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहाल, तसेच त्याच्या सुख दु:खात साथ द्याल. त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. एकूणच हे वर्ष आपल्याला प्रगतीपथावर नेणारे आहे. आपण संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.
7 / 9
या लोकांनाही हे वर्ष आनंदाचे, उत्साहाचे आणि प्रगतीचे असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, एखादी मोठी भेटवस्तू मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यासात चांगले लक्ष दिले आणि मेहनत घेतली, तर भविष्यात त्याचे चांगले पडसाद अनुभवता येतील. त्यासाठी आता मेहनत घेतली पाहिजे. या लोकांसाठी आगामी वर्ष वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने थोडेसे तणावपूर्ण राहील. जोडीदाराशी मतभेद होतील. परंतु, सामंजस्याने परिस्थिती हाताळल्यास तणाव कमी होऊ शकेल. तसेच बाह्य परिस्थिती तणावपूर्ण असल्यास त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक जीवनावर होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लोकांकडे लक्ष न देता आपले आयुष्य घडवण्यावर आपण भर दिला पाहिजे.
8 / 9
अंकशास्त्रानुसार ८ मूलांक असणाऱ्या लोकांनी आपल्या कोशातून बाहेर पडत समाजात मिसळले पाहिजे. आत्मकेंद्री राहण्याची वृती आपणास घातक ठरू शकते. म्हणून शक्य तेवढे धार्मिक आणि सामाजिक धोरण आपण स्वीकारले पाहिजे. तीच बाब आपण जोडीदाराबाबत लक्षात घेतली पाहिजे. केवळ आपला विचार न करता काही गोष्टी त्यांच्या कलाने घेतल्या, तर संसार गुण्यागोविंदाने होऊ शकेल. कुटुंब आणि मित्रपरिवाराशी जुळवून घेताना जिथे विचार पटत नसतील, तिथे शांत राहून दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांसाठी हे वर्ष समाधानाचे राहील. कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अडी अडचणीतून मार्ग काढता येईल. व्यापाऱ्यांसाठी तर हे वर्ष वरदान आहे. त्यामुळे त्यांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे, कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. तसेच विद्यार्थ्यांनाही या वर्षात घवघवीत यश मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यांनी हलगर्जीपणा करता कामा नये. ८ मूलांकाचे प्रतिनिधित्व शनिदेव करतात. त्यांची कृपादृष्टी लाभावी असे वाटत असेल, तर मेहनतीला पर्याय नाही.
9 / 9
तुमचा अंकज्योतिषानुसार मूलांक ९ असेल, तर या वर्षात तुम्हाला प्रगतीला खूप वाव आहे. जर तुम्हाला आर्थिक परिस्थिती भरभक्कम व्हावी असे वाटत असेल, तर तुम्हाला रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या गडबडीत कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष होऊ शकते. परंतु तुम्हाला घर आणि काम यांचा समन्वय साधावा लागेल. विद्यार्थ्यांना हे वर्ष फलदायी असणार आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनापासून मेहनत घेतली, तर त्यांना उज्वल भविष्य प्राप्त होऊ शकते. नोकरदारांसाठी वर्षाची सुरुवात आशादायी ठरणार आहे. व्यावसायिकांनाही अनेक संधी आहेत. आजवर आपले निलंबित असलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील. आपले स्वास्थ्य चांगले राहील. परंतु, कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यांचे सहकार्य लाभल्यास आपल्याला हर क्षेत्रात यश मिळू शकेल.