अभिमानास्पद! आशियाई स्पर्धेत पदकांचा 'चौकार' मारणारी ईशा; भारताच्या लेकीची 'सोनेरी' कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:05 IST
1 / 10चीनच्या धरतीवर रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी तिरंग्याची शान वाढवली. १८ वर्षीय ईशा सिंगने एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदक जिंकून चीनच्या धरतीवर तिरंगा फडकावला.2 / 10ईशा सिंगचे हे सोनरी यश साहजिकच अभिमानास्पद आहे. 3 / 10ईशाने २५ मीटर पिस्तूल सांघिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून आशियाई स्पर्धेत भारताचे राष्ट्रगीत वाजवले. 4 / 10तसेच तिला २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात रौप्य, १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिकमध्ये रौप्य आणि १० मीटर एअर पिस्तूल संघात रौप्य पदक मिळवण्यात यश आले. 5 / 10ईशाने मागील काही वर्षांत नेमबाजीत स्वत:चे चांगले नाव कमावले आहे. ईशाचे वडील सचिन सिंग हे मोटरस्पोर्ट्समध्ये नॅशनल रॅली चॅम्पियन राहिले आहेत. त्यामुळे ईशाला वडिलांकडून या खेळाचे प्रशिक्षण मिळाले.6 / 10स्पर्धेच्या चौथ्या दिवशी ईशाला नेमबाजीत रौप्य पदक जिंकण्यात यश आले. 7 / 10ईशाने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत ३४ गुण मिळवले आणि रौप्य पदक जिंकले. चीनच्या लिऊ रुईने ३८ गुणांसह सुवर्ण पदक जिंकले. तर कोरियाच्या जिनला २६ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 8 / 10शुक्रवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत पलक आणि ईशा सिंग यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून नेमबाजीत भारताची पदकांची घौडदौड सुरूच ठेवली.9 / 10ईशा सिंगने पदकांचा चौकार मारताना २३९.७ गुणांसह रौप्य पदकावर आपले नाव कोरले. 10 / 10चीनमधील हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. भारतीय शिलेदारांनी सुरूवातीपासूनच नेमबाजीत पदके जिंकली. यामध्ये 'नारी शक्ती'चा समावेश अधिक आहे.