शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Journey of Gold Medalist Avani Lekhara : ११वर्षांची असताना भीषण अपघातामुळे आलं अपंगत्व, जाणून घ्या गोल्डन गर्ल अवनी लेखराचा प्रेरणादायी प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:39 PM

1 / 9
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. १० मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे.
2 / 9
पॅरालिम्पकच्या इतिहासात भारताला नेमबाजीत मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. तिने २४९.६ गुणांसह वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवून ही सुवर्ण कमाई केली.
3 / 9
नोव्हेंबर २०१९मध्ये एका मुलाखतीत तिनं टोक्योत पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मुळच्या जयपूरच्या अवनीच्या या यशात तिच्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.
4 / 9
८ नोव्हेंबर २००१मध्ये राजस्थानच्या जयपूर येथे अवनीचा जन्म झाला. पण, २०१२ मध्ये तिच्या आयुष्याला धक्कादायक कलाटणी मिळाली.
5 / 9
११ वर्षांच्या अवनीचा कार अपघातात पाठीचा कणआ मोडला आणि त्यामुळे ती आयुष्यभरासाठी व्हिलचेअरवर आली. पण, तिनं या अंपगत्वाला तिच्या स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही आणि तिनं शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली.
6 / 9
शिक्षणासोबतच अवनीनं खेळातही काही तरी करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. अवनीनं नेमबाजी व तिरंदाजी या दोन्ही खेळांत प्रयत्न करायला हवं, असं त्यांना वाटायचे. २०१५मध्ये ते तिला नेमबाजी व तिरंदाजी शिकण्यास घेऊन गेले, पण ती नेमबाजीच्या प्रेमात पडली.
7 / 9
त्यामागेही एक कारण आहे. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राची बायोग्राफी 'अ शॉट एट हिस्ट्री' वाचले. त्यानंतर अवनीनं नेमबाजीवर संपूर्ण लक्ष केंद्रीत केले. तिनं जयपूर येथील जगतपूरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नेमबाजीचे धडे गिरवले.
8 / 9
२०१५मध्ये सरावाला सुरूवात केल्यानंतर काही महिन्यांतच तिनं राजस्थान राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेसाठी अवनीनं रायफल उसणी घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांत तिनं राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. २०१६ ते २०२० या कालावधीत अवनीनं राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकली. या वर्षी तिनं पॅरा नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेतही रौप्यपदक नावावर केले.
9 / 9
अवनीचे वडील प्रविण लखेरा हे राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे महसूल विभागात RAS ऑफिसर आहेत. अवनीची आई तिच्यासोबत टोक्योत गेली आहे. महाराष्ट्राच्या नेमबाज सुमा शिरूर या अवनीच्या प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवनीने ही सुवर्ण कामगिरी करून दाखविली.
टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाShootingगोळीबार