शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रेरणादायी! वयाच्या ११व्या वर्षी आई-वडील गमावले; अमन सेहरावतनं ऑलिम्पिक गाठून मैदान मारलंच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 1:51 PM

1 / 11
अमन सेहरावतने भारताची परंपरा राखत कुस्तीत पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय शिलेदारांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.
2 / 11
कुस्तीत भारत पदाकाच्या शोधात होता. पण, शुक्रवारी अमन सेहरावतने कांस्य पदकाची कमाई केली. २००८ पासून भारत प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदक जिंकत आला आहे.
3 / 11
बीजिंग ऑलिम्पिकपासून भारताला कुस्तीने पदकांच्या बाबतीत निराश केले नाही. पॅरिसमध्येही अमनने ती परंपरा खंडित होऊ दिली नाही आणि पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात कांस्य पदक जिंकले.
4 / 11
कांस्य पदकाच्या लढतीत २१ वर्षीय अमनने १३-५ असा मोठ्या फरकाने विजय संपादन केला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा सर्वात तरूण भारतीय खेळाडू म्हणून अमनच्या नावाची नोंद झाली आहे.
5 / 11
अमनने त्याचे ऐतिहासिक पदक आपल्या आई-वडिलांना आणि देशाला समर्पित केले. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर पदक जिंकल्याने अमन प्रसिद्धीच्या झोतात आला.
6 / 11
पण, त्याचा इथपर्यंतचा प्रवास खूपच संघर्षमय राहिला आहे. पॅरिसच्या धरतीवर तिरंगा फडकावणाऱ्या अमनला आई-वडिलांचे प्रेम फार काळ लाभले नाही.
7 / 11
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अमनने आई-वडिलांना गमावले. एवढ्या लहान वयात त्याच्या डोक्यावरून आई-वडिलांची सावली उठल्याने त्याच्या आयुष्यात अंधार पसरला.
8 / 11
मात्र त्याने या अंधारावर मात करण्यासाठी कुस्तीचे क्षेत्र निवडले. मेहनतीच्या जोरावर त्याने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारून कांस्य जिंकले. यासह त्याने त्याच्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
9 / 11
अमनच्या वडिलांनी त्यांच्या अकाली निधनापूर्वी त्यांच्या वडिलांनी २०१३ मध्ये अमनला छत्रसाल स्टेडियममध्ये दाखल करून कुस्तीचा मार्ग दाखवला होता. काही वेळातच हे स्टेडियम अमनचे दुसरे घर बनले.
10 / 11
२०२२ हे वर्ष अमनच्या कारकिर्दीतील एक मोठे टर्निंग पॉइंट ठरले. त्याने आशियाई अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि आशियाई अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि आता दोन वर्षांनंतर त्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.
11 / 11
२०२२ हे वर्ष अमनच्या कारकिर्दीतील एक मोठे टर्निंग पॉइंट ठरले. त्याने आशियाई अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि आशियाई अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि आता दोन वर्षांनंतर त्याने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीIndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी