आनंद महिंद्रांनी पूर्ण केलं वचन, शीतल देवीला भेट दिली स्कॉर्पिओ-एन; बदल्यात उद्योगपतींना मिळाली अनमोल भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:07 IST
1 / 8भारताची तिरंदाज शीतल देवी हिला बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी एक एसयूव्ही भेट दिली. यावर शीतलने आनंदचे आभार मानले आहेत. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष महिंद्रा यांनी पॅरालिम्पियन आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच पायाने तिरंदाजी करण्याच्या शीतलच्या क्षमतेचे कौतुक केले. 2 / 8शीतल देवी ही जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील लोईधर गावातील एक प्रतिभावान पॅरा-तिरंदाज आहे. जन्मापासूनच फोकोमेलिया नावाच्या दुर्मिळ आजारामुळे तिचे दोन्ही हात विकसित होऊ शकले नाहीत.3 / 8असे असूनही, पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरीमुळे शीतल देवीने कांस्यपदक जिंकले. शीतलने पायाचा उपयोग करुन तिरंदाजीत प्रभुत्व मिळवलं आहे. ती तिच्या पायाने धनुष्य धरते आणि तिच्या खांद्यावर आणि दातांच्या मदतीने बाण सोडते.4 / 8शीतलने आशियाई पॅरा गेम्समध्ये वैयक्तिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव केला होता. याशिवाय तिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकले. तिच्या असाधारण कामगिरीने प्रभावित होऊन, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी तिला महिंद्राची कोणतीही कार निवड करण्याची ऑफर दिली होती. शीतलच्या गरजेनुसार ती गाडी तयार करण्याचे आश्वासनही आनंद महिंद्रा यांनी दिले होते.5 / 8आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या वचनानुसार त्यांनी शीतल देवीला नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन भेट दिली. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनच्या चाव्या हातात धरताना शीतल देवी खूप भावूक झाली होती.6 / 8शीतल देवीने एक्स पोस्टमधून आनंद महिंद्रांसोबतच्या भेटीची आठवण करून दिली. शीतलने सांगितले की, जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की आनंद महिंद्रांनी फोन करुन मला तुला भेटायचे असं सांगितलं. त्यावर मला वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत प्रँक करत आहेत. पण जेव्हा मला कळले की ते खरे आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला!7 / 8शीतलने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिची सर्वोत्तम कामगिरी केली होती. तिने राकेश कुमारसोबत मिश्र सांघिक कंपाऊंड स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. शीतल आणि राकेश या जोडीने इटलीच्या मॅटेओ बोनासिना आणि एलिओनोरा यांना इन्व्हॅलाइड्समध्ये १५६-१५५ ने पराभूत करून तुर्कीच्या पॅरालिम्पिक विक्रमाची बरोबरी केली होती.8 / 8महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ही देशातील सर्वात प्रसिद्ध एसयूव्हीपैकी एक आहे. या गाडीत शक्तिशाली २.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि २.२ लीटर डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय या वाहनात ६-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सारखे फीचर्स आहेत. थारप्रमाणेच या वाहनात ४ बाय ४ ड्राइव्हचा पर्यायही देण्यात आला आहे.