शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Neearaj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राला काय काय सहन करावं लागतंय?; विचारला गेला 'Sex Life' बद्दल प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 6:21 PM

1 / 8
भालाफेकपटू नीरज चोप्रानं ( Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला, तर १२५ वर्षांत भारतानं प्रथमच ट्रॅक अँड फिल्डमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले.
2 / 8
ऑलिम्पिक पदक जिंकून मायदेशात परतलेल्या नीरज चोप्राचा देशभरात सत्कार होत आहे. कधी हरयाणा, कधी उत्तर प्रदेश, कधी दिल्ली, तर कधी पंजाब असे सोहळे सुरूच आहेत. त्यात वेळ मिळेल तसा तो ऑनलाईन मुलाखतीही देत आहे. नुकतंच त्यानं रेडिओ FMची RJ मलिष्का हिला मुलाखत दिली आणि त्यावेळी नीरजसमोर मलिष्का व तिच्या सहकारी महिला कर्मचाऱ्यांनी डान्स केला. त्यावरून मलिष्का प्रचंड ट्रोल झाली.
3 / 8
एका इंग्रजी चॅनलच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिकेनं नीरजला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारून टाकले. त्यावरून नेटिझन्सनी तिला ट्रोल केले. त्यात आणखी एका प्रश्नाची भर पडली आहे. यावेळी नीरजला ट्रेनिंग आणि सेक्स लाईफ याचा ताळमेळ कसा राखतोस, असा विचित्र प्रश्न विचारला गेला.
4 / 8
हा प्रश्न प्रसिद्ध डिझायनर राजीव सेठी यांनी केला. त्यांनी विचारले की,''देशातील कोट्यवधी लोकांना याबाबत माहिती हवीय, म्हणून मी तुला एक प्रश्न विचारतो. तू अ‍ॅथलिट ट्रेनिंग आणि सेक्स लाईफ यातील बँलेन्स कसा राखतोस?'' ते इथवरच थांबले नाहीत. ''मला माहित्येय हा खूप बकवास प्रश्न आहे. पण, यामागे एक गंभीर प्रश्न लपला आहे,''असेही ते म्हणाले.
5 / 8
हा प्रश्न ऐकल्यानंतर नीरज लाजला आणि फक्त सॉरी सर सॉरी सर म्हणाला.''मी सॉरी म्हटलं आहे. आता तुम्ही समजून घ्या,''असे नीरजनं उत्तर दिले. पण तरीही सेठी यांनी वारंवार त्याला हाच प्रश्न केला. अखेरीस नीरजनं हात जोडले अन् म्हणाला, प्लीज सर, तुमच्या प्रश्नानं माझं मन भरलं.
6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021