शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बजरंग पुनिया, शरथ कमल, अजय ठाकूर 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 5:02 PM

1 / 5
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी पद्म पुरस्कार देण्यात आले. विविध क्षेत्रातील 112 जणांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये 9 खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया, टेबल टेनिसपटू शरथ कमल, कबड्डीपटू अजय ठाकूर आणि बुद्धिबळपटू हरिका द्रोणावली यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
2 / 5
बजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याशिवाय त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.
3 / 5
टेबल टेनिसपटू शरथ कमलनेही 2018चे वर्ष गाजवलं. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने चार पदकांची कमाई केली. पुरुष सांघिक गटात त्याने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, तर पुरुष दुहेरीत, पुरुष एकेरीत आणि मिश्र दुहेरीत रौप्य व कांस्यपदक जिंकले.
4 / 5
भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार अजय ठाकूरलाही पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुबईत कबड्डी मास्टर्स स्पर्धा जिंकली होती.
5 / 5
महिला ग्रँड मास्टर हरिका द्रोणावलीलाही पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय गिर्यारोहक बाचेंद्री पालला पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. पद्म श्री पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू सुनील छेत्री, क्रिकेटपटू गौतम गंभीर, तिरंदाज बोम्बल्या देवी लैश्राम, बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग यांचाही समावेश आहे.
टॅग्स :Wrestlingकुस्तीChessबुद्धीबळTable Tennisटेबल टेनिसKabaddiकबड्डी