Corona Virus Lockdown : बॉक्सरपटूनं ऑर्डर केले 50 हजारांचे Pizza!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:29 IST
1 / 7जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 19लाख 26,235 वर पोहोचली आहे. त्यापैली 1 लाख 19, 724 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर 4 लाख 52, 326 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. 2 / 7ब्रिटनमध्येही मागील चार आठवड्यापासून लॉकडाऊन आहे. वर्ल्ड बॉक्सिंग काऊंसिलचा हेव्हिवेट चॅम्पियन टायसन फुरी त्याच्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये आहे.3 / 7या लॉकडाऊनच्या काळात टायसननं जवळपास 557 पाऊंड किमतीचे पिझ्झा आणि चिकनची ऑर्डर दिली. भारतीय रकमेत या बिलाची किंमत ही जवळपास 50 हजाराच्या वर जात आहे. 4 / 7ईस्टरच्या निम्मित्तानं त्यानं ही ऑर्डर दिली होती आणि त्याच्या या ऑर्डरची लंडनमध्ये चर्चा आहे.5 / 7टायसननं पिझ्झा आणि चिकनच्या ऑर्डरचा स्वीकार करताना डिलिव्हरी बॉयजपासून दोन मीटरचं अंतर ठेवलं होतं. टायसननं त्याला 100 पाऊंडची टीपही दिली.6 / 7टायसनचं कुटूंब मोठं आहे आणि तो एवढा खर्च सहज करू शकतो. लॉकडाऊनच्या काळात पैसा खर्च करण्यापलिकडे त्याच्याकडे काहीच काम नाही, असे त्याच्या नातेवाईकानं सांगितलं.7 / 7 टायसन लंडनमध्ये त्याची पत्नी, पाच मुलं, आई आणि सासरे यांच्यासोबत राहत आहे.